• Download App
    Babajani Durrani

    Babajani Durrani : शरद पवारांची साथ सोडणार माजी आमदार बाबाजानी दुर्राणी, 8 जून रोजी अजितदादांच्या राष्ट्रवादीत प्रवेश

    विशेष प्रतिनिधी

    परभणी : शरद पवार यांना परभणीत मोठा धक्का बसला आहे. शरद पवारांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतील परभणीतील नेते आणि माजी आमदार बाबाजानी दुर्राणी Babajani Durrani हे शरद पवारांची साथ सोडून अजित पवारांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याच्या तयारीत आहेत. त्यांच्या पक्षप्रवेशाची तारीख देखील ठरली आहे. बाबाजानी दुर्राणी यांनी आज कार्यकर्त्यांसोबत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेतला.

    एकीकडे शरद पवार आणि अजित पवार गट पुन्हा एकत्र येणार असल्याच्या चर्चा रंगत आहेत. तर दुसरीकडे माजी आमदार बाबाजानी दुर्राणी हे शरद पवार यांची साथ सोडून राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश करण्याच्या तयारीत आहेत. पुढील काही काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर बाबाजानी दुर्राणी यांचा अजित पवार गटात होणारा प्रवेश शरद पवारांसाठी मोठा धक्का मानला जात आहे. Babajani Durrani



    बाबाजानी दुर्राणी यांनी आज पाथरीमध्ये आपल्या कार्यकर्त्यांची बैठक बोलावली होती. या बैठकीत त्यांनी पक्षांतराचा निर्णय जाहीर केला असून अजित पवारांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. येत्या ८ जून रोजी बाबाजानी दुर्राणी हे पाथरीत अजित पवार यांच्या उपस्थितीत आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह अधिकृतपणे राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश करणार आहेत. बाबाजानी दुर्राणी यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर शरद पवारांच्या राष्ट्रवादी पक्षाला मोठे खिंडार पडणार आहे. Babajani Durrani

    दरम्यान, महाराष्ट्रात अजित पवार आणि शरद पवार एकत्र येणार असल्याच्या चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरू झाल्या आहेत. यावर अनेक तर्क वितर्क देखील लावले जात आहेत. याबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांनाच प्रश्न विचारण्यात आला तेव्हा त्यांनी एका वाक्यातच विषय संपवला.

    दोन्ही पवार कधी एकत्र येणार? असा प्रश्न विचारला असता, शरद पवार ‘मला माहीत नाही’, असे म्हणाले. तर याबाबत बोलताना रोहित पाटील म्हणाले की, दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? हा प्रश्न जसा तुम्हाला पडला आहे, तसाच अनेकांना पडला आहे. दोन्ही पवार एकत्र येणार ही फक्त चर्चा आहे. वरिष्ठांनी याबाबत काहीही सांगितलेले नाही. दुसरीकडे, अजित पवार यांनी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्रित येण्याच्या चर्चांवर बोलणे टाळले. पत्रकारांनी त्यांना आज याबाबत प्रश्न विचारला असता, ते यावर काहीच प्रतिक्रिया न देता पत्रकारांच्या समोरून निघून गेले.

    Former MLA Babajani Durrani will leave Sharad Pawar, join Ajit’s NCP on June 8

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Malegaon sugar factory election बारामती नाही उरली एकतर्फी, हा खरा माळेगावच्या निवडणुकीचा संदेश!!

    बारामतीकरांचा पवारांना आत्तापर्यंतचा सगळ्यात मोठा धक्का; माळेगाव साखर कारखान्याच्या निवडणुकीत शरद पवारांच्या संपूर्ण पॅनलचा पराभव!!

    श्री चिन्मयमूर्ती संस्थानकडून पंढरीच्या विठूरायास साडेसतरा लाखांचा सुवर्ण तुळशीहार अर्पण!