• Download App
    Prithviraj Chavhan काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री पराभवाच्या

    Prithviraj Chavhan : काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री पराभवाच्या छायेत, लोकसभा निवडणूक निकालांनी वाढवले टेन्शन

    Prithviraj Chavan

    विधानसभेचा आखाडा

    कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघ


    विशेष प्रतिनिधी

    Prithviraj Chavhan अतुल भोसले यांची तरुणांमधील वाढती क्रेझ पाहून माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण ( Prithviraj Chavhan ) चांगलेच धास्तावले आहेत. कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघात यावेळी अनपेक्षित निकाल लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे.Prithviraj Chavhan

    लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघात भाजपचे

    उदयनराजे भोसले यांना ९२,८१४ तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे शशिकांत शिंदे यांना ९२,१९८ मते मिळाली होती. काँग्रेस विचारांचा मतदारसंघ म्हणून ओळख असलेल्या या मतदारसंघात प्रथमच भाजपने मताधिक्य घेतल्याने डॉ.अतुल भोसले यांनी विधानसभेची सेमी फायनल जिंकली अशीच चर्चा आहे.



    कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघ हा यशवंतराव चव्हाण यांच्या विचारांचा किंवा काँग्रेस विचारांचा मतदारसंघ म्हणून ओळखला जातो. आजवर जिल्ह्यात राष्ट्रवादी आणि भाजपची लाट आली तरी काँग्रेसचाच आमदार निवडून दिला आहे. आजवर येथून दिवंगत यशवंतराव मोहिते, विलासराव पाटील -उंडाळकर यांनी नेतृत्व केले. सध्या काँग्रेसचे नेते, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण नेतृत्व करीत आहेत.भाजपचे नेते डॉ.अतुल भोसले यांनी यापूर्वी २ वेळा कराड दक्षिणमधून निवडणूक लढविली. पण त्यांना यश आले नाही. तरीही त्यांनी सातत्याने विकास कामे व समाजकार्याचा धडाका सुरू ठेवला आहे. लोकसभा निवडणुकीt त्यांनी परिश्रम घेतले. त्यामुळे भाजपचे उमेदवार उदयनराजे भोसले यांना

    ६१६ मतांचे मताधिक्य मिळाले. यामुळे पृथ्वीराज चव्हाण धास्तावले आहेत.

    कराड दक्षिण विधानसभा पृथ्वीराज चव्हाण, उदयसिंह पाटील-उंडाळकर यांची रयत संघटना, इंद्रजीत मोहिते यांना मानणारा गट आणि राष्ट्रवादीचे अविनाश मोहिते यांच्या मतांची गोळाबेरीज पाहता काँग्रेसची ताकद आहे. पण हे सगळे गट चव्हाण यांचे काम करणार का हा प्रश्न आहे. दुसऱ्या बाजूला चव्हाण राज्यातले मोठे नेते असले तरी त्यांचा मतदार संघात फारसा संपर्क नाही. पहिल्या फळीतील ठराविक पदाधिकाऱ्यांशीच त्यांचे बोलणे होते. नवीन, युवा कार्यकर्त्यांचार पूर्ण अभाव आहे. ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांशी तर त्यांचा अजिबात संपर्क नाही.

    डॉ. अतुल भोसले यांच्या माध्यमातून 2014, 2019 आणि आता 2024 पर्यंत भाजपची वाढलेली मतांची टक्केवारी पाहता भाजपलाहमोठी सुवर्णसंधी आहे.कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघ हा सुरुवातीपासूनच काँग्रेसचा बालेकिल्ला राहिला आहे. परंतु, राज्यात 2014 मध्ये झालेल्या राजकीय घडामोडीनंतर सलग सात वेळा आमदार राहिलेल्या काँग्रेसच्या माजी मंत्री स्व. विलासकाका पाटील-उंडाळकर आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण याच्यात झालेल्या लढतीत पृथ्वीराज चव्हाण यांनी बाजी मारली. 2019 मध्ये अपक्ष लढलेल्या उदयसिंह पाटील-उंडाळकर यांना मात देत पृथ्वीराज चव्हाण यांनी अपेक्षित विजय मिळवला 2014 च्या निवडणुकीत झालेल्या तिरंगी लढतीत भाजपमधून नशीब आजमावणाऱ्या डॉ. अतुल भोसले यांना दुसऱ्या क्रमांकावर राहिलेल्या विलासकाकांपेक्षा केवळ 1,792 मते कमी मिळाली. तरीही दोन दिग्गजांच्या तुलनेत ती दखलपात्र म्हणून नोंदली गेली. या निवडणुकीत ते 18,260 मतांनी विजयापासून दूर राहिले.

    तर 2019 च्या निवडणुकीत दुसऱ्या क्रमांकावर झेप घेत केवळ 9,130 मतांनी पराभव पत्करावा लागलेल्या डॉ. अतुल भोसले यांनी माजी मुख्यमंत्र्यांना तगडी टक्कर दिली होती. या दोन्ही निवडणुकांत डॉ. भोसले यांच्या मतांमध्ये 24,554 इतकी झालेली वाढ तिसऱ्या क्रमांकावर फेकल्या गेलेल्या उदयसिंह पाटील-उंडाळकर यांना मिळालेल्या 29,401 मतांवरून अधोरेखित होते. अतुल भोसले यांनी जनसंपर्कात सातत्य ठेवले आहे. आपल्या सततच्या कामाने पदाधिकारी, कार्यकर्त्यांना पाठबळ दिले आहे. उद्योग समूहाच्या माध्यमातून हाताला काम दिल्याने युवकांमध्ये त्यांची मोठी क्रेझ आहे. त्यांनी कृष्णा हॉस्पिटलच्या माध्यमातून कोरोना काळात केलेले काम लोक विसरलेले नाहीत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक वरिष्ठ नेत्यांच्या नेत्यांच्या माध्यमातून त्यांनी मोठ्या प्रमाणात विकासनिधी आणला आहे.

    2024 मध्येही पृथ्वीराज चव्हाण आणि डॉ. अतुल भोसले यांच्यातच थेट लढत होणार आहे. काँग्रेस पक्ष म्हणून दक्षिणेत मतांचा मतगठ्ठा आहे. तो एकत्र ठेवण्यासाठी रयत संघटनेच्या कार्यकर्त्यांमध्ये असलेली अन्यायाची भावना दूर करत काँग्रेसच्या या दोन्ही गटांत एकदिली राखण्याचे पृथ्वीराज चव्हाण यांच्यापुढे आव्हान आहे.

    “Former Congress CM Under Shadow of Defeat, Lok Sabha Election Results Heighten Tension”

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस