• Download App
    शीतल म्हात्रे व्हायरल व्हिडीओ प्रकरणात चौकशीसाठी स्पेशल इन्वेस्टीगेशन टीमची स्थापना Formation of special investigation team for investigation in Sheetal Mhatre viral video case

    शीतल म्हात्रे व्हायरल व्हिडीओ प्रकरणात चौकशीसाठी स्पेशल इन्वेस्टीगेशन टीमची स्थापना

    प्रतिनिधी

    मुंबई : शिवसेना प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांचा कथित व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आता या प्रकरणाचे पडसाद उमटू लागले आहेत. याप्रकरणी आतापर्यंत पाच जणांना अटक करण्यात आली आहे. ठाकरे गटाच्या युवासेना कार्यकारिणीचे सदस्य साईनाथ दुर्गे यांना मुंबई पोलिसांनी मुंबई विमानतळावरुन ताब्यात घेतले. या प्रकरणाचे पडसाद विधीमंडळातही उमटले. Formation of special investigation team for investigation in Sheetal Mhatre viral video case

    भाजप आमदार मनिषा चौधरी यांनी या प्रकरणामागच्या मास्टरमाईंडला शोधून काढा, अशी मागणी केली. त्यावर सरकारने या प्रकरणाच्या चौकशीसाठी वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्याच्या नेतृत्वाखाली एसआयटीची स्थापन करण्याची घोषणा मंत्री शंभूराज देसाई यांनी विधीमंडळात केली.

    शीतल म्हात्रे यांनी आणखी एक गंभीर आरोप केला आहे. यासंदर्भात त्यांनी मुंबई पोलीस आयुक्तांची भेट घेतली. काही बाईकस्वार पाठलाग करत असल्याचा आरोप शीतल म्हात्रे यांनी केला आहे. आज सकाळी दादर शिवाजी पार्क इथल्या निवासस्थानापासून कार्यालयात जात असताना सिद्धिविनायक मंदिर परिसरात एका बाईकस्वार कारजवळ आला. माझ्या सुरक्षेसाठी पोलिसांना ही गोष्ट लक्षात आल्यानंतर ते पुढे आले. पोलीस पाहाताच बाईकस्वार पसार झाला, असे शीतल म्हात्रे यांनी सांगितले. या संदर्भात मुंबई पोलीस आयुक्तांना माहिती दिल्याचेही शीतल म्हात्रे यांनी सांगितले.

    व्हायरल व्हिडिओ प्रकरणी शीतल म्हात्रे यांनी पुन्हा एकदा ठाकरे गटावर आरोप केला आहे. ठाकरे गटाकडून हा व्हिडिओ व्हायरल करण्यात आला आहे. आदित्य ठाकरे यांचा निकटवर्तीय समजल्या जाणाऱ्या साईनाथ दुर्गेला अटक करण्यात आले आहे. यावरुन या गोष्टी कोणत्या थराला गेल्या आहेत, हे कळते, असे शीतल म्हात्रे यांनी सांगितले.

    Formation of special investigation team for investigation in Sheetal Mhatre viral video case

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    Gold : सोन्याने नवा विक्रम केला प्रस्थापित, पहिल्यांदाच किंमत ९७ हजारांच्या जवळ पोहोचली

    अविश्वास ठरावाला तोंड देण्यापूर्वीच कर्जत जामखेड मध्ये रोहित पवार समर्थक नगराध्यक्षांचा राजीनामा; रोहित पवारांनी नगरपंचायतीची गमावली सत्ता!!

    Thackeray brothers ठाकरे बंधूंच्या व्हॅलेंटाईन गुलाबाला लांब लांब काटे; दोघांच्या सैनिकांनी फोडले वेगवेगळे फाटे!!