वरिष्ठाच्या जाचाला कंटाळून वनाधिकारी दीपाली चव्हाण यांनी आत्महत्या केली होती. तक्रार करूनही या वरिष्ठावर कारवाई करण्यास टाळणारा वनक्षेत्र संचालक श्रीनिवास रेड्डी याला पोलीसांनी अखेर अटक केली आहे.Forest Officer Deepali Chavan suicide case, Srinivasa Reddy finally gone
विशेष प्रतिनिधी
नागपूर : वरिष्ठाच्या जाचाला कंटाळून वनाधिकारी दीपाली चव्हाण यांनी आत्महत्या केली होती. तक्रार करूनही या वरिष्ठावर कारवाई करण्यास टाळणारा वनक्षेत्र संचालक श्रीनिवास रेड्डी याला पोलीसांनी अखेर अटक केली आहे.
अमरावती ग्रामीण पोलिसांनी नागपूर गुन्हे शाखेच्या मदतीने रेड्डीला अटक केली. प्रकरणात श्रीनिवास रेड्डी याच्यावर निलंबनाची कारवाईदेखील केली आहे. अमरावती ग्रामीण पोलिसांनी दीपाली चव्हाणच्या आत्महत्येला कारणीभूत असल्याच्या आरोपाखाली रेड्डी यांच्यावर गुन्हाही दाखल केला आहे.
रेड्डी गुन्हा दाखल झाल्यापासून अटक टाळण्यासाठी लपून छपून फिरत होता. अमरावती पोलीस त्याचा शोध घेत होते. बुधवारी दुपारपासून त्यांचे लोकेशन नागपुरात दिसत असल्यामुळे अमरावती ग्रामीण पोलिसांची चमू नागपुरात दाखल झाली.
त्यांनी गुन्हे शाखा तसेच स्थानिक सायबर सेलच्या मदतीने रेड्डीची शोधाशोध सुरू केली.रात्री उशिरा शहरातील एका हॉटेल जवळ तो दिसल्यानंतर पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या. या कारवाईची नागपुरात जुजबी नोंद केल्यानंतर अमरावती ग्रामीण पोलिसांचे पथक त्याला सोबत घेऊन गेले.
अमरावती जिल्ह्यातील मेळघाट व्याघ्र प्रकल्पांतर्गत येणाºया हरिसाल वनपरिक्षेत्राच्या अधिकारी आरएफओ दीपाली चव्हाण यांनी सर्व्हिस रिव्हॉल्व्हरने स्वत:वर गोळ्या झाडून आत्महत्या केली. मृत्यूपूर्वी दीपाली चव्हाण यांनी अपर प्रधान मुख्य वन संरक्षक रेड्डी यांना उद्देशून लिहिली होती.
उपवनसंरक्षक विनोद शिवकुमार आपला छळ करत आहेत. अश्लिल वर्तन करत आहेत,असा आरोप केला होता. शिवकुमार हेच दीपाली चव्हाण यांच्या आत्महत्येस जबाबदार असल्याचे स्पष्ट झाले होते.
शिवकुमार याच्या त्रासासंदर्भात दीपालीने रेड्डी यांना पत्राद्वारे माहिती दिली होती. मात्र, त्यावर कारवाई करण्यात आली नाही. त्यामुळे आत्महत्या प्रकरणात रेड्डींविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी होत होती. त्यानुसार त्याच्यावर गुन्हा दाखल झाला होता.
Forest Officer Deepali Chavan suicide case, Srinivasa Reddy finally gone
महत्त्वाच्या बातम्या
- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मानले रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांचे आभार
- एकनाथ खडसेंचे मानसिक संतुलन बिघडलंय, गिरीष महाजन यांचा आरोप
- अक्षय कुमार- ट्विंकल खन्नाचा मदतीचा हात, १०० ऑक्सिजन कॉन्सेंट्रेटर करणार दान
- भारतीय कोव्हॅक्सिन लई भारी, विषाणूचे ६१७ प्रकार नष्ट करण्याची क्षमता, जयराम रमेश, शशी थरूर तोंडावर पडले
- परमवीर सिंग याना अडविण्याचा असाही डाव, ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल