• Download App
    शेतकऱ्यांच्या, कष्टकऱ्यांच्या, न्याय हक्कांसाठी सदाभाऊ खोत यांच्या नेतृत्वात "वारी शेतकऱ्यांची" पदयात्रा सुरू For the rights of farmers laborers justice led by Sadabhau Khot Vari Farmers walk started

    शेतकऱ्यांच्या, कष्टकऱ्यांच्या, न्याय हक्कांसाठी सदाभाऊ खोत यांच्या नेतृत्वात “वारी शेतकऱ्यांची” पदयात्रा सुरू

    शेतकऱ्यांच्या मागण्या समजून घेण्यासाठी माजी विरोधी पक्षनेते आमदार प्रवीण दरेकर उपस्थित राहीले.

    विशेष प्रतिनिधी

    सातारा – शेतकऱ्यांच्या, कष्टकऱ्यांच्या, न्याय हक्कांसाठी सदाभाऊ खोत यांच्या नेतृत्वात “वारी शेतकऱ्यांची” पदयात्रा कराड येथून सुरू झाली असून आज या पदयात्रेचा दुसरा दिवस होता. शेतकरी बांधवांच्या हक्कांसाठी पदयात्रा मार्गक्रमण करत असताना. आज ओंकार मंगल कार्यालय कोर्टी येथे शेतकऱ्यांच्या मागण्या समजून घेण्यासाठी माजी विरोधी पक्षनेते आमदार प्रवीण दरेकर उपस्थित राहीले. For the rights of farmers laborers justice led by Sadabhau Khot Vari Farmers walk started

    ‘’वारी शेतकऱ्याची ह्या शेतकऱ्यांच्या हक्कासाठी आणि मागण्यांसाठी असलेल्या पदयात्रेला सुरुवात करत असताना महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि शेतकरी चळवळीचे आग्रही नेते यशवंतराव चव्हाण यांच्या समाधी स्थळाला वंदन करून आम्ही व वारीमध्ये सहभागी झालेल्या रयत क्रांती संघटनेचे कार्यकर्ते, सरपंच परिषद मुंबई महाराष्ट्र, उस वाहतूकदार संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या पदाधिकारी आणि शेतकरी बांधवांनी ही वारी यशस्वी करण्यासाठी प्रेरणा घेतली.’’ असल्याचं सदाभाऊ खोत यांनी सांगितलं.

    याचबरोबर ‘’शेतकरी चळवळीतील माझ्या वाटचालीतील हा एक महत्त्वाचा टप्पा आहे, जिथे मी शेतकऱ्यांचा आवाज बनत आहे, त्यांच्या प्रश्नाला पाठिंबा देत खांद्याला खांदा लावून लढण्याचं बळ मला माझ्या आईकडून व वडीलांकडून मिळालं. शेतकरी, शेतमजूर, बाराबलुतेदार त्यांच्या हक्काच्या मागण्या सामाजिक आणि राजकीय व्यासपीठावर नेण्याचा सदैव प्रयत्न करत असताना अण्णा व माझी आई माझ्या पाठीशी उभे राहिले आहेत. मला खात्री आहे ही पदयात्रा यशस्वी होऊन शेतकऱ्याच्या मागण्या मायबाप सरकार पूर्ण करेल.’’ असा विश्वासही सदाभाऊ खोत यांनी व्यक्त केला.

    ‘’शेतकऱ्यांच्या मुलांचा उद्याचं भविष्य ह्या वारीतून होणाऱ्या शासनाच्या निर्णयावर अवलंबून आहे. शेतकऱ्यांच्या पोरांच्या चेहऱ्यावरचा हा आनंद टिकवायचा असेल तर, शासनाला ह्या उद्याच्या पिढीचा विचार करावाच लागेल आणि एक ठोस निर्णय घेऊन शेतकऱ्यांच्या समोरील प्रश्नांवर चर्चा करून त्यावर तोडगा काढावाच लागेल.’’ असं सदाभाऊ खोत यांनी सांगितलं आहे. काळूस येथील पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील कार्तिक पाठारे नावाचा हा अवघ्या दहा वर्षाचा मुलगा रयत क्रांती संघटनेचा झेंडा घेऊन वारीच्या पुढे आनंदाने नृत्य करताना दिसून आला.

    For the rights of farmers laborers justice led by Sadabhau Khot Vari Farmers walk started

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले- ठाकरे सरकार नसते तर दीड वर्षे आधीच मेट्रो आली असती; मुंबई मेट्रो लाईन-2 सेवेचा शुभारंभ

    Dadar station : महाराष्ट्रात सतर्कता; दादर स्टेशनजवळ स्वामीनारायण मंदिरात पोलिसांकडून मॉक ड्रिल; मुख्यमंत्र्यांची बैठक

    Mumbai Metro ‘मुंबई मेट्रो मार्ग 3, टप्पा 2’ सेवेचा शुभारंभ ; फडणवीसांनी दाखवला हिरवा झेंडा