विशेष प्रतिनिधी
मुंबई : राज्यातील कारागृहात बंदी असलेल्या महिला कैद्यांच्या मुक्ततेसाठी ‘मिशन मुक्ता’ही मोहीम राबविण्यात येणार आहे, अशी माहिती महिला आणि बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी दिली. For the release of women prisoners ‘Mission Mukta’ campaign : Yshomati Thakur
राज्यातील महिला कारागृहात अनेक महिला कच्चे कैदी आहेत. अनेकदा क्षुल्लक प्रकरणात कोठडीची शिक्षा होते. जामिन मिळवण्याचा मार्ग उपलब्ध असतो. मात्र नक्की काय करायला हवे? कुठल्या प्रकारे अर्ज करावा? याची माहिती नसल्याने, पुरेशी आर्थिक स्थिती नसल्याने तसेच काही तांत्रिक मुद्दयांमुळे अशा महिलांना जामिन मिळत नाही.
अशी प्रलंबित प्रकरणे लवकर सोडवून या महिला कैद्यांना मुक्त करणेबाबत महिला बाल विकास विभाग कोणती भूमिका बजावू शकतो, याबाबत मंत्रालयात बैठक घेतली, अशी माहिती यशोमती ठाकूर यांनी दिली. कारागृहात बंदी असलेल्या महिला कैदी मुक्ततेसाठी ‘मिशन मुक्ता’ही मोहीम राबविण्यात येईल. या दृष्टीने संबंधित विभागांची मदत घेतली जाईल, अशी माहिती महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी सांगितले.
- महिला कैद्यांच्या मुक्ततेसाठी ‘मिशन मुक्ता’ अभियान
- कारागृहात अनेक महिला कच्चे कैदी आहेत
- क्षुल्लक प्रकरणात महिलांना कोठडीची शिक्षा
- सुटकेबाबत महिलांना करणार प्रबोधन करणार
- महिला आणि बालकल्याण विभाग मदत करणार
For the release of women prisoners ‘Mission Mukta’ campaign : Yshomati Thakur
महत्त्वाच्या बातम्या
- कोरोनाच्या काळात सर्वात धडाडीचे काम योगी सरकारचे, ऑक्सिजन कमतरतेवर यशस्वी मात, कानपुर आयआयटीकडून कौतुक
- ऐन दसरा – दिवाळीच्या तोंडावर सिलिंडर दरवाढीने ग्राहक गॅसवर, वर्षात तीनशे रुपयांची दरवाढ
- जगभरात आपल्या देशाचं नाव प्रगतीच्या शिखरावर नेणाऱ्या नेहा नारखेडे
- कोव्हिशिल्डची ‘ब्लूप्रिंट’ चोरून रशियान बनविली ‘स्पुटनिक’ लस, ब्रिटनचा खळबळजनक आरोप