विशेष प्रतिनिधी
मुबंई : महाराष्ट्रातील राजकारणात सध्या महाराजकारण चालू आहे असेच दिसत आहे. सध्या राज्यात नाही तर देशभरात आर्यन खान ड्रग प्रकरण गाजत आहे. याबाबत रोज समीर वानखेडे आणि नवाब मलिक एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करताना दिसून येत आहेत.
For the first time, Shiv Sena has expressed its opinion on the allegation made by Nawab Malik against Sameer Wankhede
नुकताच नवाब मलिक यांनी आमिर वानखेडेवर बरेच मोठे आरोप केले होते. समीर वानखेडे हे मुस्लीम असून नोकरीसाठी कागदपत्रे खोटी दाखल केली आहेत. असा आरोप त्यांनी केला होता. त्याचप्रमाणे वानखेडे यांच्या पहिल्या लग्नातील फोटो देखील मालिकेने शेअर केले होते आणि वानखेडे हे मुस्लीम आहेत असा दावा केला होता. मात्र मलिक यांनी सादर केलेले हे पुरावे आणि केलेले व्यक्तिगत आरोप योग्य नाहीत असा एक मतप्रवाह सध्या सोशल मीडियावर ट्रेण्ड होताना दिसून येत आहे. महाराष्ट्र आघाडीमधील प्रमुख घटक असलेल्या शिवसेनेनेही या प्रकरणावर आता नाराजी व्यक्त केली आहे.
या सर्व प्रकरणात शिवसेनेने पहिल्यांदाच आपली थेट भूमिका मांडली आहे. अदानी प्रकरणामध्ये 20 हजार कोटी रुपयांचे ड्रग्ज पकडले गेले होते. त्या बातमीला मीडिया कव्हरेज मिळत नसून आर्यन खानच्या केसला इतके मीडिया कव्हरेज का मिळते? महाराष्ट्र राज्याला बदनाम करण्यासाठी केंद्र सरकार तपास यंत्रणांचा चुकीचा वापर करत आहे. अशी देखील भूमिका शिवसेनेने यावेळी मांडली आहे. शिवसेनेने सामना मधील अग्रलेखातून अतिशय मोजक्या शब्दामध्ये नवाब मलिक यांची वैयक्तिक आरोप करण्याची पद्धत चुकीची आहे. असे मत व्यक्त केले आहे.
याबद्दल शिवसेनेने सामना वृत्त पत्रात लिहिले, राज्याचे मंत्री नवाब मलिक यांनी हे प्रकरण सुरुवातीपासून लावून धरले आहे. लोकशाही मध्ये तो त्यांचा अधिकार आहेच. पण अशा वादग्रस्त प्रकरणात टीका करताना संबंधित अधिकाऱ्याच्या व्यक्तिगत आयुष्याला मध्ये आणू नये. विरोधी पक्षावर कठोर टीका करायला हरकत नाही किंवा संबंधित अधिकार्यांवर कठोर टीका करायला हरकत नाही. पण ती कार्यवाई पुरतीच मर्यादित असायला हवी. असे शिवसेनेने म्हटले आहे.
For the first time, Shiv Sena has expressed its opinion on the allegation made by Nawab Malik against Sameer Wankhede
महत्त्वाच्या बातम्या
- STORY Behind SAMNA Editorial:खबरदार महाराष्ट्रात ड्रग्ज बाळगणाऱ्यांवर कारवाई कराल तर…निष्पाप रिया-आर्यनसारख्या मुलांना छळाल तर … ठाकरे-पवार सरकार हे ‘उपद्व्याप’ खपवून घेणार नाही …!
- एसटी कर्मचाऱ्यांची दिवाळी होणार गोड ; सरकारने दिली ‘ ही ‘ भेट
- नवाब मलिकच बनले आर्यन खानचे वकील एवढा का पुळका का आलाय – चंद्रकांत पाटील
- Bank Holidays November 2021 : नोव्हेंबरमध्ये 17 दिवस बँका बंद राहणार! ही आहे सुट्यांची यादी!