विशेष प्रतिनिधी
सातारा : पर्यटनाला चालना देण्यासाठी आणि पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने एक अनोखी बस तयार केली आहे. ही पर्यटन बस महाबळेश्वर पर्यटनासाठी वेगळ्या पद्धतीने बनविली आहे.For Mahabaleshwar Tourism Special bus service started
महाबळेश्वर मध्ये येणाऱ्या प्रवाशांना,पर्यटकांना विविध ठिकाणच्या पर्यटनाचा आनंद घेता यावा,यादृष्टीने या बसची बांधणी करण्यात आली आहे . महाबळेश्वर आणि प्रतापगड या भागात ही बस धावणार आहे. सातारा आगारामध्ये ही बस दाखल झाली असून या बसमध्ये ४१ प्रवाशांची आसन क्षमता आहे.
या बसचे वैशिष्ट्य म्हणजे बसच्या टपाला पूर्णपणे सन रूफ असल्यामुळे पर्यटकांना बाहेरच्या निसर्गाचा आनंद लुटता येणार आहे. तसेच बसच्या सीट शेजारील असणाऱ्या खिडकीचा काचा देखील वाढवण्यात
आल्यामुळे ही बस आकर्षक दिसत आहे. मागील वर्षी या बसचा प्रयोग अयशस्वी झाल्यामुळे या बसमध्ये बदल करून पुन्हा ही बस सातारा जिल्ह्यातील पर्यटनासाठी सज्ज झाली आहे.
For Mahabaleshwar Tourism Special bus service started
महत्त्वाच्या बातम्या
- नितेश राणे यांचा बदनामी करणारा बॅनर अखेर पोलिसांनी उतरवला
- डॉ. किरण गुरव, प्रणव सखदेव, संजय वाघ यांना साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी केले अभिनंदन
- आज संपणार समीर वानखेडे यांचा NCBचा कार्यकाळ, कारकीर्दीत पकडली 1000 कोटींची ड्रग्ज, तर 300 हून अधिक जणांना अटक
- 2021ची वर्षाअखेर गाजतेय जुमला अवॉर्ड सेरिमनीने!!; And the Award goes to जुमला फकीर…!!