गेल्याच आठवड्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे पुतणे निहार बिंदूमाधव ठाकरे आणि अंकिता 28 डिसेंबर रोजी विवाहबंधनात अडकले आहेत. Following Harshvardhan Patil, daughter Ankit Patil also tested positive for corona
विशेष प्रतिनिधी
मुंबई : भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांच्या पाठोपाठ कन्या अंकित पाटील यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. अंकिता पाटील यांनी ट्विटरवरुन याविषयी माहिती दिली.
‘आज माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आलेली आहे.माझी तब्येत व्यवस्थित आहे.डॉक्टरांच्या सल्ल्याने मी पुढील उपचार घेणार आहे.माझ्या संपर्कात आलेल्यांनी आपली कोरोना चाचणी करून घ्यावी व सर्वांनी आपली काळजी घ्यावी.’ असे ट्वीट अंकिता पाटील यांनी केले आहे.
गेल्याच आठवड्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे पुतणे निहार बिंदूमाधव ठाकरे आणि अंकिता 28 डिसेंबर रोजी विवाहबंधनात अडकले आहेत. मोठ्या शाही थाटात मुंबईतील ‘ताज’ हॉटेलमध्ये दोघं लग्नबंधनात अडकले.