विशेष प्रतिनिधी
बोली भाषेतून समाजाचे प्रश्न समाजापर्यंत मांडण्याचे अनमोल कार्य लोक कलावंत अनेक पिढ्यांपासून करत आले आहेत. कोरोना काळात लोक कलावंतांना राज्य सरकारने ५ हजार रुपयांचे मानधन जाहीर केले. मात्र ते ग्रामीण भागातील लोक कलावंतापर्यंत पोचले नाही. त्याबद्दल कलाकारांनी आपल्या व्यथा मांडल्या.Folk artist didnot get government honorarium
राज्यातील कलावंतांच्या कलेचा सन्मान व्हावा म्हणून मानधनही दिले जाते. तसेच कोरोना काळात कुठलेही कार्यक्रम करता आले नाहीत म्हणून राज्याचे मुख्यमंत्री, सांस्कृतिक मंत्री अमित देशमुख यांनी लोककलावंताना ५ हजार रुपये मानधन जाहीर केले. यामुळे सर्वच क्षेत्रातील कलावंतांना हा मोलाचा आधार मिळणार आहे. पण, ते केव्हा मिळणार या प्रतीक्षेत ते आहेत.
- कोरोनात कार्यक्रमावर बंदीचा कलाकारांना फटका
- उत्पन्न नसल्याने कलावंतावर उपासमारीची वेळ
- लोक कलावंत सरकारी मानधनापासून वंचितच
- ग्रामीण लोक कलावंतापर्यंत मानधन पोचलेच नाही
- सरकारने केली ५ हजाराचे मानधन देण्याची घोषणा
- खात्यात पैसे केव्हा भरणार, सरकारला सवाल
- मानधनाच्या प्रतीक्षेत आहेत लोक कलावंत