• Download App
    महाविकास आघाडी सरकारकडून पूरग्रस्तांची फसवणूक, फसव्या आघाडीशी संबंध ठेवायचे का नाही याचा विचार, राजू शेट्टी यांचा इशारा|Flood victims cheated by Mahavikas Aghadi government, Raju Shetty warns Mahavikas Aghadi government to split

    महाविकास आघाडी सरकारकडून पूरग्रस्तांची फसवणूक, फसव्या आघाडीशी संबंध ठेवायचे का नाही याचा विचार, राजू शेट्टी यांचा इशारा

    विशेष प्रतिनिधी

    कोल्हापूर : राज्यातील महाविकास आघाडी सरकारने पूरग्रस्त शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे. अशा फसव्या आघाडीशी संबंध ठेवायचे का याचा विचार करावा लागेल, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी मंगळवारी ऊस परिषदेत दिला.Flood victims cheated by Mahavikas Aghadi government, Raju Shetty warns Mahavikas Aghadi government to split

    स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या जयसिंगपूर येथे आयोजित ऊस परिषदेत शेट्टी यांनी आघाडी सरकारवर हल्लाबोल केला. ते म्हणाले, पावसात भिजत आणलेले आघाडी सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे राहील, या विश्वासाला तडा गेला आहे. महापुराने महाराष्ट्रातील शेतीचे मोठे नुकसान झाले आहे.



    नदीकाठची उस शेती पूर्णपणे खराब झाली आहे. अतिवृष्टी आणि पूरग्रस्त शेतकऱ्यांना तोकडी मदत देऊन तोंडाला पाने पुसली आहेत. अशा आघाडीशी संबंध ठेवायचे का याचा गंभीर विचार करावा लागेल. जो काही निर्णय होईल तो आता सरकारला माध्यमातूनच कळेल. यापुढे कोणत्याही नेत्याला भेटायला जाणार नाही. दिवाळीला मंत्र्यांना राज्यातील मंत्र्यांना काळे झेंडे दाखवा, असे आवाहन त्यांनी केले.

    साखर कारखानदारांची प्रश्न सोडवण्यासाठी केंद्र शासनाने बैठक बोलावली. नाममात्र आश्वासन देऊन कारखान्यांची बोळवण केली. नीती आयोगाच्या माध्यमातून एफआरपीचे तुकडे करण्याचा प्रयत्न खपवून घेतला जाणार नाही, असा इशारा त्यांनी दिला.

    Flood victims cheated by Mahavikas Aghadi government, Raju Shetty warns Mahavikas Aghadi government to split

    महत्त्वाच्या बातम्या

     

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस