• Download App
    महाबळेश्वर तालुक्यात पूर परिस्थिती : ४ गावांचा संपर्क तुटला, १२ गावांतील २३३ कुटुंबांचे स्थलांतर |Flood situation in Mahabaleshwar taluk: 4 villages cut off, 233 families from 12 villages displaced

    महाबळेश्वर तालुक्यात पूर परिस्थिती : ४ गावांचा संपर्क तुटला, १२ गावांतील २३३ कुटुंबांचे स्थलांतर

    प्रतिनिधी

    सातारा : सातारा, महाबळेश्वर, पांचगणी, वाई, जावली परिसरात मुसळधार पाऊस सुरू आहे. महाबळेश्वर तालुक्यात कोयना नदीला पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. चतुरबेट साकव पूल पाण्याखाली गेल्यामुळे चतुरबेट , घोणसपूर सह चार गावांचा संपर्क तुटला आहे. महाबळेश्वर व वाई तालुक्यात होत असलेल्या पावसाने सुरक्षिततेच्या दृष्टीने महाबळेश्वर तालुक्यातील दहा आणि वाई तालुक्यातील दोन अशा बारा गावातील २३३ कुटुंबांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्यात आले आहे.Flood situation in Mahabaleshwar taluk: 4 villages cut off, 233 families from 12 villages displaced

    मागील वर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे चतुरबेट पूल वाहून गेला होता.बांधकाम विभागाने सिमेंटच्या पाईप टाकून तापूरता पुल तयार केला होता तोही वाहून गेला आहे. दरम्यान या परिसरात दळणवळणासाठी लोखंडी साकवपुल तयार करण्यात आला होता. तोही पाण्याखाली गेल्यामुळे या परिसरात चार गावांचा संपर्क तुटला आहे अशी माहिती सरपंच नंदा जाधव यांनी दिली.



    महाबळेश्वर व वाई तालुक्यात मागील वर्षी अतिवृष्टी झाली होती. यामुळे त्यामुळे अनेक गावातील ग्रामस्थांचे खूप मोठे नुकसान झाले होते .यावेळीही मुसळधार पाऊस या परिसरात सुरूच असून महाबळेश्वर , वाई तालुक्यात होत असलेल्या अतिवृष्टीच्या अनुषंगाने सुरक्षिततेच्या दृष्टीने तात्पुरते स्थलांतर करणे आवश्यक असल्याने

    महाबळेश्वर तालुक्यातील दरे, दुधोशी, घावरी,येर्णे बु, येर्णे खुर्द, मालूसर, चिखली, माचुतर, शिंदोळा, धावली या दहा गावातील २०३ कुटुंबांचे व ९४० व्यक्तींचे स्थलांतर जिल्हा परिषद शाळा, मंदिर, खाजगी बंगले व हॉटेलमध्ये करण्यात आले आहे. वाई तालुक्यातील जोर डुईचीचीवाडी येथील ३० कुटुंबातील १६४ ग्रामस्थांचे जिल्हा परिषद शाळा, समाज मंदिर व एका घरामध्ये स्थलांतर करण्यात आले त्याची माहिती प्रांताधिकारी राजेंद्र जाधव यांनी दिली.

    Flood situation in Mahabaleshwar taluk: 4 villages cut off, 233 families from 12 villages displaced

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    Dr. Mohan Bhagwat : संघ सगळं ठरवत असता, तर (भाजपचे अध्यक्ष निवडायला) एवढा वेळ लागला असता का??; कानपिचक्या की सूचना??

    मराठा आंदोलनाच्या खांद्यावर बंदूक ठेवणाऱ्या‌ राजकीय पक्षांचे होईल मोठे नुकसान; मुख्यमंत्री फडणवीसांचा इशारा!!

    Radhakrishna Vikhe Patil : राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले- जरांगे चर्चेसाठी तयार असतील, तर सरकारही तयार; दोन्हीही बाजूंनी समन्वय आवश्यक