वृत्तसंस्था
पुणे : पंधरा दिवस पुण्यातून विमानांचे उड्डाण होणार नाही. धावपट्टीच्या कामामुळे विमानतळ राहणार बंद राहणार आहे. या निर्णयाच्या अंमलबजावणीस शनिवारपासून (१६ ) सुरुवात झाली आहे. flights from lohgaon airport closed from 16 october
मागील वर्षी सप्टेंब मध्ये हवाई दलाने विमानतळाच्या धावपट्टीच्या देखभाल दुरुस्तीचे काम हाती घेतले होते. या कामातील महत्त्वाचा टप्पा १६ ऑक्टोबरपासून सुरू झाला आहे. त्यामूळे २९ऑक्टोबरपर्यंत विमानतळ पूर्णपणे बंद राहणार आहे, अशी माहिती विमानतळ प्रशासनाने दिली आहे.
दहा दिवसांपूर्वीच लोहगाव विमानतळ बंद राहणार असल्याची घोषणा प्रशासनाने केली होती. त्यामळे प्रवाशांची तारांबळ उडाली आहे.
या निर्णयाचा फटका १६ ते ३० ऑक्टोबर दरम्यान तिकिट रिजर्वेशन केलेल्या प्रवाशांना बसणार आहे. यापूर्वी कोरोनाच्या लॉकडाउनमध्ये रात्रीची उड्डणे बंद केली होती. त्यामुळे हजारो प्रवाशांना तिकिटे रद्द करावी लागली होती. आताही तिकिटे बुक केलेल्या प्रवाशांना तिकिट रिजर्वेशन रद्द करण्यास आणि त्याचा परतावा परत मिळवण्यास मोठी दमछाक करावी लागणार आहे.
दसऱ्याला ६३ विमानांचे सिमोल्लंघन
दसऱ्याऱ्याला पुणे विमानतळावरून तब्बल ६३ विमानांची उड्डाणे झाली. यात ९८०३ प्रवासी पुण्याहून दुसऱ्या शहरांत गेले तर ८५२४ प्रवासी पुण्यात दाखल झाले. प्रवासी संख्येचा हा एक विक्रम आहे.
flights from lohgaon airport closed from 16 october
महत्त्वाच्या बातम्या
- चीनच्या अवकाशवीरांचा स्पेसवॉकचा विचार; अवकाश स्थानकामध्ये सहा महिने वास्तव्य
- केरळमध्ये पूरसदृश परिस्थिती, १८ जणांचा बळी; लष्कराकडे मदतीसाठी याचना; भूस्खलनात २२ जण बेपत्ता
- Sooryavanshi Movie : ये दिवाली अक्षय वाली ! अक्षय कुमारचा ‘सूर्यवंशी’ दिवाळीत करणार धमाका ; 5 नोव्हेंबरला होणार रिलीज!
- PM Kisan Samman Nidhi Yojana : या दिवशी तुमच्या खात्यात जमा होईल 10 वा हप्ता आत्ताच करा नोंदणी
- साम्यवाद – भांडवलशाही यांच्या पलिकडचे एकात्म अर्थचिंतन; दत्तोपंत ठेंगडींचे कार्य जगभर पोहोचविण्याची गरज : दत्तात्रेय होसबाळे