खबरदारीचा उपाय म्हणून शाळेतील सर्व शिक्षकांच्या अँटिजेन टेस्ट आज बुधवार ५ जानेवारी रोजी करण्यात आल्या Five teachers at an English medium school in Pune tested positive; The administration’s concern grew
विशेष प्रतिनिधी
पुणे : गेल्या दोन महिन्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा आलेख कमी आला होता. मात्र गेल्या दोन दिवसात रुग्णांची संख्या वाढू लागली आहे.दरम्यान पुणे जिल्ह्याच्या खेड तालुक्यातील फुरुस येथील एका इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिकवणाऱ्या पाच शिक्षकांची अँटिजेन चाचणी पॉझिटिव्ह आली.यामुळे तालुका प्रशासनाची चिंता वाढली आहे.
या शाळेतील एक शिक्षिका आजारी असल्याने तिची दोन दिवसांपूर्वी आरटीपीसीआर टेस्ट करण्यात आली होती. मात्र, या टेस्टचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला.
त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून शाळेतील सर्व शिक्षकांच्या अँटिजेन टेस्ट आज बुधवार ५ जानेवारी रोजी करण्यात आल्या. त्यामध्ये तब्बल चार शिक्षकांच्या चाचण्या पॉझिटिव्ह आल्याने एकच खळबळ उडाली आहे.
Five teachers at an English medium school in Pune tested positive; The administration’s concern grew
महत्त्वाच्या बातम्या
- मुंबई : बेस्टच्या ६६ कर्मचार्यांना कोरोनाची लागण , ४४ जणांना रुग्णालयात दाखल ; ९ जणांना डिस्चार्ज
- भाजपकडून एसटी कर्मचाऱ्यांना मिळणार तीन महिन्यांचे रेशन मोफत
- रा. स्व. संघाची अखिल भारतीय समन्वय बैठक भाग्यनगर – हैद्राबाद येथे सुरू; भारतकेंद्रित शिक्षणाविषयी चिंतन
- पंतप्रधानांच्या सुरक्षा व्यवस्थेत त्रुटी ही चूकच : काँग्रेसचे प्रचार प्रमुख सुनील जाखड; कॅप्टन अमरिंदरसिंगांच्या सुरात सूर मिसळला सूर!!