• Download App
    विक्रोळीत सहा घरांवर दरड कोसळून 5 जण ठार, आणखी काही जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती । Five people Killed in residential building collapsed in Mumbai Vikhroli area BMC NDRF Rescue operation underway

    विक्रोळीत सहा घरांवर दरड कोसळून 5 जण ठार, आणखी काही जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती

    building collapsed in Mumbai Vikhroli area :  मध्यरात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईत हाहाकार उडवला आहे. विक्रोळी परिसरातील पंचशीलनगरमध्ये पाच ते सहा घरांवर दरड कोसळून 5 जणांचा मृत्यू झाला आहे. आणखीही काही जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. घटनास्थळी मुंबई महापालिका आणि NDRFच्या पथकाकडून मदत व बचावकार्य सुरू आहे. Five people Killed in residential building collapsed in Mumbai Vikhroli area BMC NDRF Rescue operation underway


    वृत्तसंस्था

    मुंबई : मध्यरात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईत हाहाकार उडवला आहे. विक्रोळी परिसरातील पंचशीलनगरमध्ये पाच ते सहा घरांवर दरड कोसळून 5 जणांचा मृत्यू झाला आहे. आणखीही काही जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. घटनास्थळी मुंबई महापालिका आणि NDRFच्या पथकाकडून मदत व बचावकार्य सुरू आहे.

    दुसरीकडे, चेंबुरमधील वाशी नाका परिसरातही घरांवर संरक्षक भिंत कोसळून झालेल्या दुर्घटनेत 14 जणांचा मृत्यू झाला असून तेथेही आणखी काही जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. दोन्ही ठिकाणी रेस्क्यू ऑपरेशन वेगाने सुरू आहे. दोन्ही ठिकाणचा मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

    विक्रोळीतील लाल बहादूर शास्त्री मार्गावर असलेल्या सूर्यानगर परिसरात ही दुर्घटना घडली आहे. शनिवारी मध्यरात्री पावणे तीन वाजेच्या सुमारास पाच ते सहा घरांवर दरड कोसळली. ढिगाऱ्याखाली अडकून आतापर्यंत 5 जणांनी प्राण गमावले असून एनडीआरएफच्या पथकाच्या मते आणखी पाच ते सहा जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

    Five people Killed in residential building collapsed in Mumbai Vikhroli area BMC NDRF Rescue operation underway

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य