• Download App
    भीमानगर पुलाजवळ ट्रक-टँकरच्या भीषण अपघातात पाच जण ठार|Five killed in truck-tanker accident near Bhimanagar bridge

    भीमानगर पुलाजवळ ट्रक-टँकरच्या भीषण अपघातात पाच जण ठार

    विशेष प्रतिनिधी

    सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यात भीमानगर पुलाजवळ शनिवारी रात्री ११ वाजता मळीचा टँकर आणि तांदळाच्या ट्रक यांच्यात भीषण अपघात होऊन पाचजण जागीच ठार झाले. या अपघातात सहाजण गंभीर जखमी झाले आहेत.Five killed in truck-tanker accident near Bhimanagar bridge

    टँकर इंदापूरहून सोलापूरकडे निघालेला होता. भीमा नगर येथे एका पुलाजवळ सरदारजी ढाब्यासमोर हा टँकर आला असता समोरुन येणारा तांदळाचा ट्रक रस्ता दुभाजकाला धकडून समोरून येणा-या या टँकरवर जोरदार आदळला.



    मळीच्या टँकर चालकाचा जागीच मृत्यू झाला तर ट्रक पलटी होऊन चालकाच्या केबीनमधे बसलेले पाचजण जागीच ठार झाले. ट्रकमधील लहान मुलं आणि स्त्रीयांसह तीनजण जखमी झाले आहेत.ट्रक पलटी झाल्यावर आतील तांदळाचे पोते रस्त्यावर पडले होते.

    यामुळे दोन्हीकडील वाहतूक ठप्प झाली. रात्री पावणे एक वाजेपर्यंत वाहने बाजूला करण्याचे काम सुरू हाेते. दोन्ही बाजूला जवळपास २ किलो मीटर अंतरापर्यंत वाहतूक ठप्प झाली होती.

    Five killed in truck-tanker accident near Bhimanagar bridge

    महत्त्वाच्या बातम्या

     

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस