• Download App
    कळव्यात दरड कोसळून 5 जण ठार, ढिगाऱ्याखालून 2 जणांची सुटका, रेस्क्यू ऑपरेशन सुरू । Five killed as rock slips in Kalwa area of Thane land slide

    कळव्यात दरड कोसळून 5 जण ठार, ढिगाऱ्याखालून 2 जणांची सुटका, रेस्क्यू ऑपरेशन सुरू

    Thane land slide : ठाणे परिसरात दरड कोसळून 5 जणांचा मृत्यू झाला आहे. ठाण्यातील कळवा पूर्व भागात ही दुर्घटना घडली. चर्च रोडवरील घोलाई नगरात असलेल्या दुर्गा चाळीत दरड कोसळली आणि घरावर पडली. यामुळे ढिगाऱ्याखाली दबून गेल्याने 5 जणांचा मृत्यू झाला आहे. Five killed as rock slips in Kalwa area of Thane land slide


    वृत्तसंस्था

    मुंबई : ठाणे परिसरात दरड कोसळून 5 जणांचा मृत्यू झाला आहे. ठाण्यातील कळवा पूर्व भागात ही दुर्घटना घडली. चर्च रोडवरील घोलाई नगरात असलेल्या दुर्गा चाळीत दरड कोसळली आणि घरावर पडली. यामुळे ढिगाऱ्याखाली दबून गेल्याने 5 जणांचा मृत्यू झाला आहे.

    कळवा पोलिस, प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन कक्ष (आरडीएमसी), ठाणे आपत्ती प्रतिसाद बल (टीडीआरएफ) आणि अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी दाखल झाले आहेत. बचाव कार्यात दोन जणांची सुटका करण्यात आली. जखमींना कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात उपचारासाठी पाठविण्यात आले आहे.

    जखमींवर उपचार सुरू

    प्रभु सुदाम यादव (45), विधावती देवी प्रभु यादव (40), रविकिशन यादव (12), सिमरन यादव (10), संध्या यादव (03) अशी मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. पाचही मृत एकाच कुटुंबातील असल्याचे सांगितले जात आहे. अचल यादव (18) आणि प्रीती यादव (05) अशी उपचार घेत असलेल्या जखमींची नावे आहेत.

    ठाण्यातील कळवा पूर्वेतील घोलाई नगराजवळील डोंगराच्या खाली दुर्गा चाळ नावाची वस्ती आहे. गेल्या 48 तासांपासून सुरू असलेल्या पावसामुळे अचानक डोंगरावरून एक मोठी दरड कोसळली. मोठा आवाज आला. लोक घाबरून घराबाहेर पडले. पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता. दरड एका घरावर कोसळली आणि ढिगाऱ्याखाली 5 जणांचा मृत्यू झाला. यानंतर बचाव पथक येण्यापूर्वी स्थानिक लोकांनी हा ढिगारा हटवायला सुरुवात केली. घटनेची माहिती मिळताच बचाव दल घटनास्थळी दाखल झाले. 2 जखमींना वाचविण्यात आले व कळवा येथील स्थानिक रुग्णालयात सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

    Five killed as rock slips in Kalwa area of Thane land slide

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Savitribai Phule memorial नायगावात सावित्रीबाई फुले स्मारकासाठी 142.60 कोटी रुपये मंजूर; फडणवीस सरकारचा निर्णय!!

    Nashik Kumbh Mela : नाशिक कुंभमेळ्यासाठी ई-बस सेवा अन् रस्ते प्रकल्पाला गती

    Delhi court : दिल्ली कोर्टात आरोपी-वकिलांची न्यायाधीशांना धमकी; म्हणाले- बाहेर भेटा, बघू तुम्ही जिवंत घरी कसे पोहोचता!