• Download App
    बसप्रवासात महिलांकडील दागिने लुटणारी टोळी जेरंबद ; ७ गुन्हे उघडकीस, यूनिट एकची कामगिरीFive held for stealing gold ornaments of pmpml passengers

    बसप्रवासात महिलांकडील दागिने लुटणारी टोळी जेरंबद ; ७ गुन्हे उघडकीस, यूनिट एकची कामगिरी

    बसप्रवासात गर्दीचा फायदा घेऊन महिलांजवळील पर्स तसेच अंगावरील सोन्याचे दागिने चोरणाऱ्या टोळीला गुन्हे शाखा यू्निट एकच्या पथकाने अटक केली. आरोपींकडून  सहा लाख ८५ हजार रुपये किमतीचे १४३ गॅ्रम सोने जप्त करण्यात आले आहे.


    विशेष प्रतिनिधी

    पुणे– बसप्रवासात गर्दीचा फायदा घेऊन महिलांजवळील पर्स तसेच अंगावरील सोन्याचे दागिने चोरणाऱ्या टोळीला गुन्हे शाखा यू्निट एकच्या पथकाने अटक केली. आरोपींकडून  सहा लाख ८५ हजार रुपये किमतीचे १४३ गॅ्रम सोने जप्त करण्यात आले असून शहरातील विविध पोलीस ठाण्यात दाखल ७ गुन्हे उघडकीस आले आहेत. Five held for stealing gold ornaments of pmpml passengers

    सर्पराज दत्तु गायकवाड (४१, रा. मुंढवा), योगेश गणेश माने (४०, रा. मुंढवा), अमित नाना चव्हाण (२६, रा. हडपसर), संतोष शरणाप्पा जाधव (३७,रा. मुंढवा), राजेंद्र उर्फ फांदेबा ज्ञानेश्वर थेऊरकर (४२, रा. मुंढवा) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.

    गुन्हे शाखेचे पथक हद्दीत गस्तीवर होते. यादरम्यान बसमध्ये चोरी करणारे सराईत एका रिक्षामधून पुणे स्टेशन परिसरात येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. यानूसार पथकाने सापळा रचून पुणे स्टेशन बसस्टॅण्ड येथून संशयीत रिक्षा ताब्यात घेतली. यावेळी गायकवाड, माने यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे केलेल्या चौकशीत त्यांनी चव्हाण, जाधव, थेऊरकर या त्यांच्या साथीदारांसह गुन्हे केल्याची कबूली दिली. यानूसार पोलिसांना तिघांना ताब्यात घेतले.

    यातील जाधव हा तडीपार असून त्याच्यावर शहरातील विविध पोलीस ठाण्यात २० पेक्षा अधिक गुन्हे दाखल आहेत. इतर सराईत आरोपी आहेत. आरोपींकडून शिवाजीनगर पोलीस ठाण्याकडील तीन, डेक्कन दोन आणि भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याकडील दोन असे सात चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत. त्यांच्याकडून ६ लाख ८५ हार रुपये िंकमतीचे १४३ ग्रॅम सोन्याचे पाटल्या, मंगळसूत्र तसेच रिक्षा जप्त केली आहे.

    ही कामगिरी अप्पर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक शैलेश संख्ये, उपनिरीक्षक सुनिल कुलकर्णी, अंमलदार दत्ता सोनवणे, इम्रान शेख, अजय थोरात, अमोल पवार, तुषार माळवदकर, महेश बामगुडे, अजय जाधव यांच्या पथकाने केली.

    Five held for stealing gold ornaments of pmpml passengers

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Gold : सोन्याने नवा विक्रम केला प्रस्थापित, पहिल्यांदाच किंमत ९७ हजारांच्या जवळ पोहोचली

    अविश्वास ठरावाला तोंड देण्यापूर्वीच कर्जत जामखेड मध्ये रोहित पवार समर्थक नगराध्यक्षांचा राजीनामा; रोहित पवारांनी नगरपंचायतीची गमावली सत्ता!!

    Thackeray brothers ठाकरे बंधूंच्या व्हॅलेंटाईन गुलाबाला लांब लांब काटे; दोघांच्या सैनिकांनी फोडले वेगवेगळे फाटे!!