विशेष प्रतिनिधी
मुंबई : महाराष्ट्र विधानपरिषद निवडणुकीत नागपुरात काँग्रेस नुसती हरली नाही, तर आयत्या वेळेला उमेदवार बदलून राजकीय दृष्ट्या काँग्रेस सारख्या एका मोठ्या राष्ट्रीय पक्षाने स्वतःचे हसू करून घेतले.Firvafirvi” of two news items of Congress: News of Nana’s ministerial post in the afternoon, and news of tree felling in the evening
या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र विधिमंडळाचे अधिवेशन सुरू होत असताना काँग्रेसच्या हायकमांडने प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना दिल्लीत बोलावून घेतल्याच्या बातम्या दुपारी आल्या. या बातम्यांमध्ये नानांना प्रदेशाध्यक्ष पदावरून बाजूला करून त्यांना मंत्रिपदी नेमले जाईल, अशा अटकळी बांधण्यात आल्या होत्या.
त्याच बातम्यांमध्ये विधानसभेच्या अध्यक्षपदावर काँग्रेस हायकमांड नेमके कोणाला बसवणार? याचाही अटकळी सुरू राहिल्या. यामध्ये माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण भोरचे काँग्रेस आमदार संग्राम थोपटे आणि मुंबईचे आमदार अमिन पटेल यांची नावे मराठी माध्यमांनी आघाडीवर असल्याचे सांगितले.
पण याच बातम्या सायंकाळी नंतर “फिरल्या”. काँग्रेस हायकमांडने नुसते नानांच फक्त दिल्लीला बोलावून घेतले असे नाही तर त्यांच्याबरोबर काँग्रेसचे मंत्री नितीन राऊत सुनील केदार यांना देखील दिल्लीत बोलावल्याच्या बातम्या आल्या आणि त्या बातम्यांमध्ये या तिघांची काँग्रेस हायकमांड झाडाझडती घेत आहे, असे नमूद करण्यात आले.
एक प्रकारे काँग्रेस मधला हा राजकीय गोलमाल उघडकीस आणण्याचा हा प्रकार होता की माध्यमांची स्वतःचीच बातम्यांची फिरवाफिरवी होती या विषयी शंका उत्पन्न झाल्या. कारण आधीच्या आणि नंतरच्या दोन्ही बातम्यांमध्ये नेमके सोर्स कोण हे नमूद नव्हते.
त्यामुळे दुपारी नानांना मंत्रीपदाची बक्षिसी देण्याच्या बातम्या संध्याकाळी मात्र झाडाझडतीमध्ये मराठी माध्यमांना “फिरवाव्या” लागल्याचे दिसून आले अर्थात या “फिरवाफिरवी” मागे काँग्रेस व्यतिरिक्त कोणत्या पक्षाच्या कोणत्या नेत्याची “प्रेरणा” आहे का?, याचा शोध दिल्लीतल्या राजकीय वर्तुळात घेतला जात आहे.
Firvafirvi” of two news items of Congress: News of Nana’s ministerial post in the afternoon, and news of tree felling in the evening
महत्त्वाच्या बातम्या
- WATCH : एसटी विलीनीकरणासाठी कुटुंबीयांसमवेत मोर्चा सांगलीमध्ये तहसील कार्यालयावर मोर्चा
- टेस्ला बेबी : टेस्लाच्या इलेक्ट्रिक कारमध्ये स्त्रीने दिला बाळाला जन्म!
- कोल्हापुरात छत्रपती शिवाजी महाराजांचे ४० फूट उंच आणि १०० फूट रुंद भव्य पोस्टर, कर्नाटक सरकराचा निषेध
- कर्नाटक सरकारचा मोठा निर्णय ; राज्य पोलीस भरतीमध्ये ट्रान्सजेंडर उमेदवारांसाठी ठेवल्या राखीव जागा