• Download App
    महिलांची पहिली महाराष्ट्र केसरी स्पर्धा सांगलीत रंगणार; महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेच्या बैठकीत निर्णयFirst Maharashtra Kesari Tournament for Women to be held in Sangli

    महिलांची पहिली महाराष्ट्र केसरी स्पर्धा सांगलीत रंगणार; महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेच्या बैठकीत निर्णय

    (संग्रहित छायाचित्र)

    सांगली जिल्हा तालीम संघाच्या वतीने करण्यात आले आयोजन

    प्रतिनिधी

    पुणे : महाराष्ट्रातील महिला कुस्तीपटूंसाठी आनंदाची बातमी आहे. कारण, आता पुरुषांप्रमाणेच महिला कुस्तीपटूंसाठीही महाराष्ट्र केसरी स्पर्धेचे आयोजन केले जाणार आहे. या पहिल्या महिला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचे आयोजन सांगलीत केले जाणार आहे. आज पुण्यात पार पडलेल्या महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. बैठकीमधील निर्णयानुसार २३ आणि २४  मार्च रोजी सांगलीत  ही स्पर्धा पार पडणार आहे. सांगली जिल्हा तालीम संघाच्या वतीने महिला केसरी कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. First Maharashtra Kesari Tournament for Women to be held in Sangli

    या स्पर्धेत दहा वजनी गटासह खुल्या गटांतील कुस्तीपटू सहभागी होणार आहेत. महाराष्ट्र केसरीसाठी ६५ वजनी गटावरील लढणार आहेत आणि ही स्पर्धा केवळ मॅटवर होणार आहे. या कुस्ती स्पर्धेतील विजयी महिला कुस्तीगीरास महिला केसरी खिताब आणि चांदीची गदा देऊन गौरविण्यात येणार आहे.


    ”गोपीनाथ मुंडे यांच्या पाठीत खंजीर खुपसणाऱ्यांना आता त्यांची आठवण झाली”


    महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेच्या बैठकीनंतर पत्रकारपरिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे महासचिव बाळासाहेब लांडगे, कार्याध्यक्ष नामदेव मोहिते, अर्जुन पुरस्कार विजेते काका पवार आणि पुणे शहर कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष अमोल बराटे उपस्थित होते.

    First Maharashtra Kesari Tournament for Women to be held in Sangli

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    Eknath Khadse : पितळ उघडं पडल्यावरही खडसे जावयाच्याच बाजूने!

    Prithviraj Chavan : सनातन संस्थेला दहशवादी म्हणणे भोवले; पृथ्वीराज चव्हाण यांना 10 कोटींची मानहानीची नोटीस

    Municipal Commissioner : पालिका आयुक्त ‘तुम बाहेर जावो’ म्हणाले,अन घोटाळा झाला !