प्रतिनिधी
धुळे : जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील एका मेणबत्ती बनवण्याच्या कारखानामध्ये भीषण आग लागल्याची घटना मंगळवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास घडली. यामध्ये पाच महिलांचा होरपळून मृत्यू झाला.Fire breaks out in candle factory, 5 women die, 5 lakhs announced for relatives of deceased
या दुर्घटनेमुळे संपूर्ण साक्री परिसर हादरून गेला असून, जैताने गाव परिसरात शोककळा पसरली आहे. चिपलीपाडा गावात वाढदिवसासाठी वापरल्या जाणाऱ्या आकर्षक मेणबत्ती बनवण्याचा कारखाना आहे, या कारखान्यात या महिला काम करीत होत्या, दुपारच्या सुमारास शॉर्ट सर्किट झाल्याने कारखान्यात आग लागली, आगीने क्षणात रौद्र रूप घेतल्याने महिलांना बाहेर पडण्याची संधीच मिळाली नाही. छोटेखानी असलेल्या कारखान्यात आग लागल्याने आशाबाई भैया भागवत वय 34, पूनम भैया भागवत वय 16, नैनाबाई संजय माळी वय 48, सिंधुबाई धुडकु राजपूत या चौघींचा जागीच मृत्यू झाला. यातील पूनम अल्पवयीन असल्याची प्राथमिक माहिती आहे. या सर्व महिला जैताने गावातील रहिवाशी आहेत. शॉर्टसर्किट मुळे ही आग लागल्याची प्राथमिक माहिती आहे. चौकशीत अजून नेमकी माहिती समोर येईल, तसेच या प्रकरणी एका संशयिताला ताब्यात घेण्यात आल्याची माहिती पोलीस अधीक्षक संजय बारकुंड यांनी दिली आहे.
मुख्यमंत्र्यांकडून मृतांच्या नातेवाइकांना प्रत्येकी 5 लाखांची मदत जाहीर
या दुर्घटनेतील प्रत्येक मृतांच्या नातेवाईकांना पाच लाख रुपयांची मदत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केली आहे. या दुर्घटनेबद्दल मुख्यमंत्री शिंदे यांनी तीव्र दुःख व्यक्त केले. मृत, त्यांच्या कुटुंबियांप्रति सहवेदनाही व्यक्त केली. या दुर्घटनेतील प्रत्येक मृतांच्या नातेवाईकांना पाच लाख रुपयांची मदत तर जखमींवरील उपचाराचा खर्च शासनामार्फत करण्याचे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले असल्याची माहिती जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी दिली आहे.
पालकमंत्र्यांनी व्यक्त केला शोक
या घटनेची माहिती मिळताच राज्याचे ग्रामविकासमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी तातडीने आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना प्रशासनास दिल्या. त्यांनी मृतांच्या नातेवाईकांचे दूरध्वनीवरून सांत्वन करून घडलेल्या घटनेबद्दल शोक व्यक्त केला.
Fire breaks out in candle factory, 5 women die, 5 lakhs announced for relatives of deceased
महत्वाच्या बातम्या
- राष्ट्रवादीतील फूट : पवारांच्या इंग्रजी आत्मचरित्राचे टायटल आहे, “ऑन माय टर्म्स”; पण मोदी – शाह कधी इतरांच्या टर्म्सवर राजकारण करतात??
- मराठी माध्यमांनी रचला महाविकास आघाडीच्या यशाचा इमला; विनोद तावडेंनी ढासळवला त्याच्या अहवालाचा पाया!!
- ‘’…तेजस्वी यादव यांनी माफियाचे फोटो त्यांच्या कार्यालयात लावावेत’’- गिरीराज सिंह भडकले!
- राष्ट्रवादीच्या इफ्तार पार्टीत अतीक अहमद हत्येवर शरद पवारांचे सूचक भाष्य; यंत्रणांनी कायदा हातात घेऊ नये!!