• Download App
    सावित्रीबाई फुलेंविरुद्ध आक्षेपार्ह लिखाण करणाऱ्या दोन वेबसाईट एक ट्विटर हँडल विरुद्ध मुंबई पोलिसांचे एफआयआर FIR registered against two websites and a Twitter account for allegedly spreading ‘false and malicious’ content in the Savitribai Phule controversy

    सावित्रीबाई फुलेंविरुद्ध आक्षेपार्ह लिखाण करणाऱ्या दोन वेबसाईट एक ट्विटर हँडल विरुद्ध मुंबई पोलिसांचे एफआयआर

    प्रतिनिधी

    मुंबई : क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या विरोधात आक्षेपार्ह लिखाण करणाऱ्या दोन वेबसाईट आणि एका ट्विटर हँडल विरुद्ध मुंबई पोलिसांनी एफआयआर दाखल केला आहे. इंडिक टेल्स आणि हिंदू पोस्ट या दोन वेबसाईट तसेच भारद्वाज स्पीक्स या ट्विटर हँडल्स वर सावित्रीबाई फुले यांच्या संदर्भात काही आक्षेपार्ह लिखाण केले असल्याचे आढळल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मुंबई पोलीस आयुक्तालयासमोर जोरदार निदर्शने केली होती आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी मुंबई पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली होती. त्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी वर उल्लेख केलेल्या दोन वेबसाईट आणि एक ट्विटर हँडल यांच्याविरुद्ध एफआयआर दाखल केला आहे. FIR registered against two websites and a Twitter account for allegedly spreading ‘false and malicious’ content in the Savitribai Phule controversy



     

    संदर्भात राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहिले होते मुख्यमंत्र्यांनी या सर्व प्रकारची दखल घेऊन इंडिक टेल्स’म या वेबसाईटवर कारवाई करण्याचे निर्देश मुख्य सचिवांना दिले होते. ‘इंडिक टेल्स’ या वेबसाईटने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्याविषयी प्रसिद्ध केलेल्या लेखामध्ये त्यांच्याबद्दल अनेक आक्षेपार्ह गोष्टी लिहिल्या आहेत, याबद्दल अनेक राजकीय संघटना, सामाजिक संस्थांनी शासनाकडे आक्षेप नोंदवले. या आक्षेपांची दखल घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या वेबसाईटवरील मजकूर तपासून त्यावर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.

    महापुरुषांच्या बाबतीत लिखाण करताना ते अत्यंत अभ्यासपूर्ण असायला हवे, तसेच त्यामधून त्यांचा अवमान होणार नाही याची दक्षता लेखक किंवा प्रकाशन संस्थांनी घेणे गरजेचे आहे. ‘इंडिक टेल्स’ वरील लेखात आक्षेपार्ह बाबी असेल तर त्यांच्यावर कडक कारवाई करावी, असे स्पष्ट निर्देश मुख्यमंत्री शिंदे यांनी दिले होते.

    FIR registered against two websites and a Twitter account for allegedly spreading ‘false and malicious’ content in the Savitribai Phule controversy

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    Thackeray brothers ठाकरे बंधूंच्या व्हॅलेंटाईन गुलाबाला लांब लांब काटे; दोघांच्या सैनिकांनी फोडले वेगवेगळे फाटे!!

    पवार काका – पुतणे आतून एकत्र, फक्त मतभेदांच्या नाटकाचे रचलेय नेपथ्य!!

    Maharashtra : महाराष्ट्रातील 10 हजार महिलांना पिंक ई-रिक्षा वाटप; नागपूरमधून योजनेला सुरुवात