Ncp Chief Sharad Pawar : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे आक्षेपार्ह छायाचित्र सोशल मीडियावर शेअर केल्याबद्दल मुंबई पोलिसांनी सोमवारी एका व्यक्तीविरुद्ध एफआयआर नोंदविला. राष्ट्रवादीचे कार्यकर्ते डी.एस. सावंत यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला, अशी माहिती अधिकाऱ्याने दिली. उपनगर चेंबूर येथील रहिवासी असलेल्या एका कार्यकर्त्याच्या तक्रारीवरून आरोपीविरुद्ध स्थानिक पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला होता. Fir Lodged Against Person Who Shared Objectionable Picture Of Ncp Chief Sharad Pawar
विशेष प्रतिनिधी
मुंबई : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे आक्षेपार्ह छायाचित्र सोशल मीडियावर शेअर केल्याबद्दल मुंबई पोलिसांनी सोमवारी एका व्यक्तीविरुद्ध एफआयआर नोंदविला. राष्ट्रवादीचे कार्यकर्ते डी.एस. सावंत यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला, अशी माहिती अधिकाऱ्याने दिली. उपनगर चेंबूर येथील रहिवासी असलेल्या एका कार्यकर्त्याच्या तक्रारीवरून आरोपीविरुद्ध स्थानिक पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला होता.
सावंत यांनी तक्रारीत म्हटले आहे की, एका फेसबुक वापरकर्त्याने पवार यांचे एडिट केलेला फोटो शेअर केल्याची माहिती त्यांना दिली आहे. ज्या व्यक्तीने आक्षेपार्ह फोटो शेअर केला आहे त्याची ओळख पटली असून त्याला पकडण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत, असे अधिकाऱ्याने सांगितले. यापूर्वी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या निवासस्थानी विरोधी पक्षांच्या नेत्यांची बैठक घेण्यात आली होती. यासह निवडणूक रणनीतिकार प्रशांत किशोर यांच्याशीही पवार यांनी तीनदा भेट घेतली होती. या बैठकीनंतर विरोधी पक्ष भाजपविरोधात तिसरी आघाडी उभारत असल्याच्या चर्चांना उधाण आले होते.
राजकीय चर्चांना उधाण
यापूर्वी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या निवासस्थानी विरोधी पक्षांच्या नेत्यांची बैठक घेण्यात आली होती. यासह निवडणूक रणनीतिकार प्रशांत किशोर यांच्याशीही पवार यांनी तीनदा भेट घेतली होती. या बैठकीनंतर, पवारांच्या नेतृत्वात तिसरी आघाडी होणार असल्याची चर्चा सुरू झाली. मात्र, कॉंग्रेसचे नेते व इतर पक्षांचे नेते पवार यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीस उपस्थित नव्हते. याबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
Fir Lodged Against Person Who Shared Objectionable Picture Of Ncp Chief Sharad Pawar
महत्त्वाच्या बातम्या
- पंजाब काँग्रेसमध्ये कलह : नवज्योतसिंग सिद्धूंना पक्षश्रेष्ठींनी दिल्लीला बोलावले, राहुल आणि प्रियांकांची आज घेणार भेट
- केंद्राचे 6.29 लाख कोटी रुपयांचे पॅकेज : सविस्तर वाचा अर्थमंत्र्यांच्या 16 मोठ्या घोषणा… कोणत्या क्षेत्रासाठी काय दिले!
- Vaccination Record : कोरोना लस देण्यात अमेरिकेच्याही पुढे निघाला भारत, जगात क्रमांक एकवर
- Gupkar Alliance Meeting : गुपकार गटाची बैठक आज, पीएम मोदींशी बैठक आणि पुढच्या रणनीतीवर चर्चा
- Jammu-Kashmir Encounter : जम्मू-काश्मीर एन्काउंटरमध्ये लश्करच्या टॉप कमांडर अबरारसह दोघांचा खात्मा