• Download App
    दहशतवादी सापडणे ही महाराष्ट्रासाठी धोक्याची घंटा; देवेंद्र फडणवीस यांचा ठाकरे - पवार सरकारला इशारा Finding Terrorists Wake Up Call Maharashtra Leader Opposition Devendra Fadnavis

    दहशतवादी सापडणे ही महाराष्ट्रासाठी धोक्याची घंटा; देवेंद्र फडणवीस यांचा ठाकरे – पवार सरकारला इशारा

    वृत्तसंस्था

    नागपूर : महाराष्ट्रात दहशतवादी सापडणे, ही राज्यासाठी धोक्याची घंटा आहे, असा इशारा भाजपचे नेते, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरकारला दिला आहे. या घटनेकडे गांभीर्याने पाहण्याची गरज असल्याचे ते म्हणाले. Finding Terrorists Wake Up Call Maharashtra Leader Opposition Devendra Fadnavis

    देशातील विविध राज्यात सणासुदीला स्फोट घडवून आणण्याचे षडयंत्र अटक केलेल्या दहशतवाद्यांनी रचले होते, असे तपासात उघड झाले होते. ते सर्व पाकिस्तानच्या ‘आयएसआय’ या गुप्तचर यंत्रणेशी सलग्न असून त्यांचा घातपाताचा डाव दिल्ली पोलिसांनी उधळून लावला आहे. या पार्श्वभूमीवर ते बोलत होते.

    देशाच्या विविध भागांमध्ये आणि विशेषत: मुंबईत दहशतवादी सापडला होता. ही महाराष्ट्रासाठी धोक्याची घंटा आहे. तसेच ठिकठिकाणी लपून बसलेल्या दहशतवाद्यांना शोधून काढणे गरजेचे आहे. अशा दहशतवाद्यांना संपवूनच टाकायला हवे, अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिली.



    नागपुरात पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, दिल्ली पोलिसांच्या विशेष सेलने ६ जणांना अटक केली. एका दहशतवाद्याला मुंबईतून अटक केल्याने फडणवीस यांनी चिंता व्यक्त केली. दहशतवाद्यांनी मुंबई लोकलची रेकी केल्याची माहिती दिल्ली पोलिसांनी केलेल्या चौकशीत उघड झाली आहे. सरकारने मुंबईसोबतच राज्यातील विविध भागात याबाबत शोध घेतला पाहिजे, असेही फडणवीस यांनी सांगितले.

    Finding Terrorists Wake Up Call Maharashtra Leader Opposition Devendra FadnavisFinding Terrorists Wake Up Call Maharashtra Leader Opposition Devendra Fadnavis

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस

    Thackeray brothers : म्हणे, ठाकरे बंधू एकत्र, अफाट ताकदीच्या वल्गनांना फुटले पंख!!

    Thakckrey brothers म्हणे, महाराष्ट्राच्या हितासाठी टाळी आणि हाळी; खरंतर ठाकरे बंधूंच्या अस्तित्वासाठी हात मिळवायची तयारी!!