विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : Nitin Gadkari आर्थिकदृष्ट्या सक्षम देशांकडून सध्या गुंडगिरी सुरू आहे.” असे म्हणत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नाव न घेता अमेरिकेला टोला लगावला आहे.Nitin Gadkari
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर 50 टक्के टॅरिफ लावण्याचा निर्णय घेतला. तसेच, भारताने रशियाकडून तेल खरेदी करू नये, अशी डोनाल्ड ट्रम्प यांची भूमिका असल्याचे समोर आले. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी विश्वेश्वरय्या राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्थेत (VNIT) आपल्या भाषणात विज्ञान आणि तंत्रज्ञानाचे महत्त्व सांगतानाच, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे नाव न घेता टोला लगावला. आपल्या भाषणात त्यांनी देशाची निर्यात वाढवण्याची गरज असण्यावरही भर दिला. ते म्हणाले की, “आज दादागिरी करणारे देश हे आर्थिकदृष्ट्या मजबूत असल्याने आणि त्यांच्याकडे नवीन तंत्रज्ञान असल्याने ते असे करू शकतात.Nitin Gadkari
भारताने निर्यात वाढवण्यावर आणि आयात कमी करण्याच्या गरजेवर भर देत गडकरी म्हणाले , जर आपल्याला भारताला ‘विश्वगुरू’ बनवायचे असेल, तर निर्यात वाढवणे आणि आयात कमी करणे आपल्यासाठी खूप महत्वाचे आहे.जर आपला निर्यात दर आणि अर्थव्यवस्थेचा दर वाढला, तर आपल्याला कोणापुढे हात पसरायची जाण्याची गरज भासणार नाही. जे देश दादागिरी करत आहेत, ते असे करत आहेत. कारण ते आर्थिकदृष्ट्या मजबूत आहेत आणि त्यांच्याकडे अत्यधुनिक तंत्रज्ञान आहे. आपल्याला चांगले तंत्रज्ञान आणि संसाधने मिळाली तरी आपण कोणावर दादागिरी करणार नाही, कारण आपली संस्कृती आपल्याला शिकवते की जगाचे कल्याण सर्वात महत्वाचे आहे.
जागतिक स्तरावर आपल्याला विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. आपल्या सर्वांनाच माहिती आहे की, या सर्व समस्यांवर विज्ञान आणि तंत्रज्ञान हाच उपाय आहे. हे सारे ज्ञान तर आहेच, पण त्यातून शक्ती आणि सामर्थ्यही मिळेल, जे आपल्याला या समस्येतून बाहेर पडण्यास मदत करेल. आपल्याला भारताला ‘विश्वगुरू’ बनवायचे असेल तर निर्यात वाढवणे आणि आयात कमी करणे खूप महत्वाचे आहे. संशोधन संस्था, आयआयटी आणि अभियांत्रिकी महाविद्यालयांनी देशाच्या गरजा लक्षात घेऊन संशोधन करावे. इतर क्षेत्रातील संशोधन देखील तितकेच महत्त्वाचे आहे, असे गडकरी म्हणाले.
Financially strong nations indulging in bullying, Nitin Gadkari targets US over Trump tariffs)
महत्वाच्या बातम्या
- India Alliance इंडिया आघाडी निवडणूक आयोगाच्या कार्यालयावर सोमवारी काढणार मोर्चा
- महिला आणि मराठा राजकारण करून थकले; ओबीसी राजकारणाच्या आश्रयाला पोहोचले!!
- Madhuri Elephant : कोल्हापूरच्या माधुरी हत्तिणीला परत आणण्यास PETA इंडियाचा आक्षेप; वनतारासारखी सुविधा महाराष्ट्रात नसल्याचा दावा
- Trump : ट्रम्प आर्मेनिया-अझरबैजानमधील 37 वर्षांचे युद्ध संपवणार; आतापर्यंत 6 युद्धे थांबवल्याचा दावा