• Download App
    निवृत्त कर्मचाऱ्यांसाठी बेस्ट उपक्रमाला ४५० कोटी रुपयांची आर्थिक मदतFinancial assistance of Rs 450 crore to BEST initiative for retired employees

    निवृत्त कर्मचाऱ्यांसाठी बेस्ट उपक्रमाला ४५० कोटी रुपयांची आर्थिक मदत

    प्रतिनिधी

    मुंबई : बेस्ट उपक्रमाच्या निवृत्त कर्मचाऱ्यांची विविध देणी भागवण्यासाठी बेस्ट उपक्रमाला यापूर्वी देण्यात आलेल्या ४०५.७३ कोटी आणि ४८२.२८ कोटी रुपयांच्या अनुदानानंतर आता आणखी ४५० कोटी रुपये आगाऊ स्वरुपात मुंबई महापालिकेने दिले आहेत. मात्र, ही रक्कम अनुदान म्हणून देण्याचा ठराव बेस्ट समितीने मंजूर केला असला तरी नगरविकास खात्याने हा ठराव रद्दबातल ठरवल्यास आजवर दिलेल्या रकमेवर बेस्टला या रकमेवर आता कर्जाऊ स्वरुपात ४ % व्याज दर आकारला जाण्याची शक्यता आहे. Financial assistance of Rs 450 crore to BEST initiative for retired employees

    बेस्ट उपक्रमाच्या १०२२ सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना अनुदान म्हणून महापालिकेकडून ४५० कोटी रुपये देण्याची मागणी बेस्ट उपक्रमाच्या महाव्यवस्थापकांनी १९ ऑगस्ट २०२२ रोजी महापालिकेकडे पत्राद्वारे केली होती. या पत्रामध्ये बेस्ट महाव्यवस्थापकांनी उपक्रमाच्या १०२२ सेवा निवृत्त कर्मचाऱ्यांना देय असलेल्या प्रलंबित भत्ते व अंतिम देयकांची रक्कम म्हणून १४१ कोटी रुपये, तसेच १० हजार ८७६ निवृत्त कर्मचाऱ्यांच्या अंतिम देयकांची रक्कम १८३ कोटी रुपये, रजा प्रवास सहाय्य भत्ता व रजा रोखीकरण म्हणून ९१ कोटींची रक्कम आणि न्यायालयाच्या निर्देशानुसार दंडात्मक व्याजाची रक्कम ३५ कोटी अशाप्रकारे ४५० रुपये अनुदान म्हणून मागणी केली होती.

    यापर्वी सन २०२१-२२ मध्ये जून २०१८ ते जून २०२० या कालावधीसाठी बेस्ट उपक्रमाच्या एकूण ३६४९ सेवा निवृत्त कर्मचाऱ्यांच्या देय रकमांच्या अधिदानासाठी बेस्ट उपक्रमाला महापालिकेने ४०५.७३ कोटी रुपयांची रक्कम आगाऊ स्वरुपात ५ ऑगस्ट २०२१ रोजी देण्यात आली होती. ही रक्कम यापूर्वी कर्ज स्वरुपात ४ टक्के व्याजदराने ३ वर्षांसाठी देण्यात आले होते. परंतु, बेस्टने ही रक्कम अनुदान म्हणून देण्याचा ठराव मंजूर केला. परंतु हा ठराव रद्दबातल ठरवून ही रक्कम कर्ज स्वरुपात देणे उचित होईल अशा प्रकारचे पत्र पाठवण्यात आले होते. पण अद्यापही शासनाकडून या पत्रावर कोणताही निर्णय घेण्यात न आल्याने महापालिकेने ही रक्कम कर्ज किंवा अनुदान या सापेक्ष दिली होती.

    निवृत्ती पश्चात देणी अद्याप प्रलंबित

    त्याचधर्तीवर जुलै २०२० ते मार्च २०२२ या कालावधीत एकूण ३५१६ निवृत्त कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित देयकांच्या रकमेचे अधिदान करण्यासाठी २५ एप्रिल २०२२ रोजी बेस्ट उपक्रमाला ४८२.२८ कोटी रुपये आगाऊ स्वरुपात देण्यात आले. तर १९ ऑगस्ट २०२२ रोजी बेस्ट उपक्रमाच्या महाव्यवस्थापकांनी महापालिकेला पाठवलेल्या वेळोवेळी अधिदान केल्यानंतरही १०२२ कर्मचाऱ्यांच्या उपदानाची रक्कम तसेच इतर कर्मचाऱ्यांची निवृत्ती पश्चात देणी अद्याप प्रलंबित असल्याचे कळवले आहे. त्यामुळे यासाठी ४५० कोटी रुपयांची मागणी केली असून अनुक्रमे २५० कोटी, ५० कोटी रुपये आणि १५० कोटी रुपयांचे अधिदान करण्यात आले आहे. त्यामुळे शासनाकडे पाठवलेल्या पत्रावर बेस्ट समितीने केलेला ठराव रद्दबातल ठरल्यास ही रक्कम कर्जाऊ स्वरुपात ४ टक्के व्याजदराने ३ वर्षांसाठी देण्यात येईल, या अटींवरच ४५० कोटी रुपयांचा आगाऊ निधी देण्यात आला आहे.

    जून २०२० पर्यंत : एकूण ३७३२ निवृत्त कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित दाव्यांकरता ४०५.७३ कोटी रुपये

    जुलै २०२० ते मार्च २०२२ पर्यंत : एकूण ३५१६ निवृत्त कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित दाव्यांकरता ४८२.२८ कोटी रुपये

    ऑगस्ट २०२२ : एकूण १०२२ सेवा निवृत्त कर्मचाऱ्यांसाठी प्रलंबित दाव्यांसाठी ४५० कोटींचे अनुदान

    Financial assistance of Rs 450 crore to BEST initiative for retired employees

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Maharashtra : राज्यातील कामगार कायद्यांमध्ये सुधारणा करुन महाराष्ट्र कामगार संहिता नियम तयार होणार!

    Savitribai Phule memorial नायगावात सावित्रीबाई फुले स्मारकासाठी 142.60 कोटी रुपये मंजूर; फडणवीस सरकारचा निर्णय!!

    त्यावेळी राज की उद्धव?, प्रश्नावर पवारांचे उत्तर “ठाकरे कुटुंबीय”; पण आता दोन्ही भावांच्या ऐक्यावर मात्र कानावर हात!!