• Download App
    Ajit Pawar पावसामुळे नुकसानग्रस्त नागरिकांना प्रत्येकी

    Ajit Pawar : पावसामुळे नुकसानग्रस्त नागरिकांना प्रत्येकी 10 हजारांची आर्थिक मदत; अजित पवार यांची मोठी घोषणा

    Ajit Pawar

    विशेष प्रतिनिधी

    बारामती : Ajit Pawar राज्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून झालेल्या मुसळधार पावसामुळे पुण्यासह कोकण, मराठवाडा, विदर्भात नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बारामती विधानसभा मतदारसंघात देखील पावसाने धुमाकूळ घातला आहे. अजित पवार यांनी आज पुन्हा एकदा बारामती मतदारसंघातील नुकसानग्रस्त भागांची पाहणी केली. यावेळी ज्यांच्या घरात पावसाचे पाणी शिरले, त्यांना दहा हजार रुपये देणार असल्याची घोषणा अजित पवार यांनी केली आहे.Ajit Pawar

    अजित पवार यांनी आज पुन्हा एकदा बारामती मतदारसंघातील नुकसानग्रस्त भागांना भेट दिली. यावेळी त्यांनी पावसामुळे नुकसान झालेल्या भागाची पाहणी केली. तसेच गावकऱ्यांशी संवाद साधला. गावकऱ्यांना दिलासा देत त्यांनी लवकरच उपयोजना केल्या जातील, असे आश्वासन देखील दिले. शेतीचे नुकसान मोठ्या प्रमाणात झाले आहे. त्याचे पंचनामे करावे लागतील. त्याला थोडा वेळ लागू शकतो. मात्र, तात्काळ धान्य देण्यात येत असून ज्यांच्या घरात पाणी गेले त्यांना दहा हजार रुपये देण्यात येणार असल्याचे अजित पवार यांनी सांगितले.



    संपूर्ण राज्यातील नुकसानग्रस्त नागरिकांना पैसे दिले जाणार आहेत का?

    यावेळी नागरिकांशी बोलताना अजित पवार म्हणाले की, गावातील नुकसानीचे पंचनामे होत आहेत. मात्र धान्य द्यायला सुरुवात झाली आहे. ज्यांच्या घरात पाणी गेले त्यांना त्यांना दहा हजार रुपये आम्ही देतोय. लवकरच पैसे सोडायला लावतो, असं म्हणत अजित पवार यांनी नुकसानग्रस्त नागरिकांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला. हे दहा हजार रुपये केवळ बारामती तालुक्यात दिले जाणार आहेत की, संपूर्ण राज्यातील नुकसानग्रस्त नागरिकांना दिले जाणार आहेत? याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. मात्र ज्यांच्या घरात पाणी गेले आहे, त्यांना पैसे देण्यात येणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे.

    Financial assistance of Rs 10,000 each to citizens affected by rain; Ajit Pawar’s big announcement

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    सरकारमध्ये राहून अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या “डबल गेमा”; सिंहस्थ कुंभमेळा आयोजनात वेगवेगळ्या मार्गांनी अडथळे!!

    Ladki Bahin Scheme : 9526 सरकारी लाडक्या बहिणींनी लाटले 14 कोटी 50 लाख रुपये, महिला व बालविकासमंत्री तटकरेंची माहिती

    Ganesh Naik : वनमंत्री गणेश नाईक यांची विधानसभेत घोषणा- बिबट्यांसाठी जंगलात 1 कोटींच्या शेळ्या सोडणार; अधिवास क्षेत्रासाठी योजना