• Download App
    अखेर हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यातील कामाला सुरुवात । Finally, work on the first phase of Hinjewadi to Shivajinagar Metro project started

    अखेर हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यातील कामाला सुरुवात

    या प्रकल्पासाठी पुणे विद्यापीठ चौकातील उड्डाणपूल एक वर्षांपूर्वीच पाडल्याने सेनापती बापट रस्ता, औंध, बाणेर येथून विद्यापीठ चौकात येते. Finally, work on the first phase of Hinjewadi to Shivajinagar Metro project started


    विशेष प्रतिनिधी

    पुणे : पुणे शहरातील हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यातील कामाला सुरुवात झाली आहे.दरम्यान पहिल्या टप्प्यात पुणे विद्यापीठ चौकातील ड्रेनेज, पाणी, वीजवाहिन्यासह उपयुक्त सेवावाहिन्या स्थलांतरण या कामांची सुरूवात करण्यात आली आहे.दरम्यान हे काम पूर्ण झाल्यानंतर मेट्रोचे खांब टाकण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे.

    या प्रकल्पासाठी पुणे विद्यापीठ चौकातील उड्डाणपूल एक वर्षांपूर्वीच पाडल्याने सेनापती बापट रस्ता, औंध, बाणेर येथून विद्यापीठ चौकात येते. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर वाहतुकीची कोंडी होते.दरम्यान वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून पर्यायी मार्गांची पाहणी पीएमआरडीए, पोलीस, महापालिका आणि टाटा कंपनीच्या अधिकाऱ्यांनी केली आहे.



    यावेळी येत्या दोन दिवसात प्रायोगिक तत्त्वावर त्यांची अंमलबजावणी सुरू करावी. तसेच त्यामध्ये काही त्रुटी आढळून आल्यानंतर आवश्‍यक त्या सुधारणा कराव्यात असा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे या उड्डाणपुलाचे काम कधी सुरु होते याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

    Finally, work on the first phase of Hinjewadi to Shivajinagar Metro project started

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Sangeet Sannyasta Khadga : ‘संगीत संन्यस्त खड्ग’ नाटकावरून वाद पेटला, गौतम बुद्धांचा अवमान झाल्याचा वंचित बहुजन आघाडीचा आरोप

    jayant patil : जयंत पाटील प्रदेशाध्यक्षपद सोडणार; शरद पवारांशी चर्चा करून 2 दिवसांत राजीनाम्याची शक्यता

    महापालिका + झेडपी निवडणुकांचा महायुतीचा खरा फॉर्म्युला; ठाकरे + पवार ब्रँड गुंडाळा, अख्खा महाराष्ट्र आपसांतच वाटून घ्या!!