प्रतिनिधी
सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग येथे आढळलेला आणि टाकीत पडलेला ब्लॅक पँथरचा बछडा आईच्या कुशीत विसावला आहे.११ नोव्हेंबर रोजी कुडाळ तालुक्यातील गोवेरी-तेंडोली येथील विजय प्रभूखानोलकर यांच्या आंबा/काजू बागेतील सिमेंटच्या पाण्याच्या टाकीत ब्लॅक पँथरचा बछडा पडला होता. त्याच्या आईची भेट घडविण्यात वनविभागाला यश मिळाले आहे .Finally the Black Panther The calf in the mother’s arms
सिंधुदुर्ग वनविभागाने पुणे येथील वन्यजीव बचाव पथकच्या सहाय्याने ही अद्वितीय कामगिरी १३ नोव्हेंबर रोजी पार पाडली. ११ नोव्हेंबर रोजी ग्रामस्थांच्या मदतीने या ७ ते ८ फूट टाकीत पिंजरा सोडला. त्यात त्याला अडकविले. त्यास पिंजऱ्यात घेत सुखरूप बाहेर काढले. त्यानंतर त्या ब्लॅक पॅन्थरची पशुवैद्यकीय अधिकारी यांनी तपासणी केली असता, तो सुद्रुढ असल्याची खात्री झाली.
- अखेर ब्लॅक पँथरचा बछडा आईच्या कुशीत
- कुडाळ तालुक्यात सिमेंट टाकीत पडला होता
- वनविभागाने पिंजरा लावून केली सुटका
- त्याच्या आईचा शोध घेतला
- अखेर बछडा आईच्या कुशीत विसावला