• Download App
    अखेर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी रुपाली चाकणकर यांचे नाव निश्चित ; महाविकास आघाडी सरकारने घेतला निर्णय । Finally, Rupali Chakankar's name has been confirmed as the chairperson of the State Women's Commission; The decision was taken by the Mahavikas Aghadi government

    अखेर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी रुपाली चाकणकर यांचे नाव निश्चित ; महाविकास आघाडी सरकारने घेतला निर्णय

    चाकणकर यांच्या नियुक्तीवर महाविकास आघाडीत एकमत झाले आहे. अन्य महामंडळावरील नियुक्त्याही लवकरच केल्या जाणार असल्याची माहिती मिळाली आहे. Finally, Rupali Chakankar’s name has been confirmed as the chairperson of the State Women’s Commission; The decision was taken by the Mahavikas Aghadi government


    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांची राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी निवड निश्चित झाली आहे. राज्यातील वाढत्या महिला अत्याचाराच्या घटना पहाता हे पद बराच काळ रिक्त होते.त्यामुळे विरोधकांकडून महाविकास आघाडी सरकारवर वारंवार टीका केली जात आहे. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारने हा निर्णय घेतला आहे. आहे.

    भाजपने राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी विजया रहाटकर यांची नियुक्ती केली होती. परंतु राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर महामंडळे आणि विविध शासकीय पदावरील नियुक्त्या रद्द करण्यात आल्या. विजया रहाटकर यांची ही नियुक्ती रद्द करण्यात आल्यानंतर महिला आयोगाचे अध्यक्षपद रिक्त होते.



    गेल्या काही महिन्यात महिला अत्याचाराच्या व सामूहिक अत्याचाराच्या घटनांच प्रमाण वाढतच चालल होत. त्यामुळे महाविकास आघाडीवर विरोधी पक्षांकडून जोरदार टीका होत आहे. याचदरम्यान राज्य महिला आयोगाच्या नियुक्त्यांचा मुद्दाही प्रामुख्याने पुढे आला आहे. त्यामुळे चाकणकर यांच्या नियुक्तीवर महाविकास आघाडीत एकमत झाले आहे. अन्य महामंडळावरील नियुक्त्याही लवकरच केल्या जाणार असल्याची माहिती मिळाली आहे.

    Finally, Rupali Chakankar’s name has been confirmed as the chairperson of the State Women’s Commission; The decision was taken by the Mahavikas Aghadi government

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    नवीन प्रणालीद्वारे होणार सार्वजनिक तक्रारींचे निवारण

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल