विशेष प्रतिनिधी
पुणे : पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट)च्या शहराध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्यानंतर प्रशांत जगताप कोणत्या पक्षात जाणार, याबाबत सुरू असलेल्या राजकीय चर्चांना अखेर पूर्णविराम मिळाला आहे. मुंबईतील टिळक भवन येथे प्रशांत जगताप यांनी काँग्रेसमध्ये अधिकृत प्रवेश केला. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडला. Prashant Jagtap
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या. मात्र, रात्री उशिरा शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी जगताप यांचे फोनवर संभाषण झाल्याची माहिती समोर आल्यानंतर ते ठाकरे गटात जाणार, अशीही जोरदार चर्चा रंगली होती. अखेर काँग्रेसमध्ये प्रवेश करून जगताप यांनी सर्व तर्कवितर्कांना विराम दिला.
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतरही प्रशांत जगताप हे शरद पवार यांच्यासोबत ठामपणे उभे राहिले होते. मात्र, सध्या शरद पवार गट आणि अजित पवार गट यांच्यात पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुका एकत्र लढवण्याबाबत चर्चा सुरू आहेत. पुणे महापालिकेत अजित पवार गटासोबत न जाण्याची ठाम भूमिका जगताप यांनी घेतली होती.
पक्षश्रेष्ठींनी मात्र आघाडी करूनच निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतल्यानंतर प्रशांत जगताप यांनी नाराजी व्यक्त करत पुणे शहराध्यक्ष पदासह सक्रिय सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता.
Finally joins Congress Prashant Jagtap
महत्वाच्या बातम्या
- एकनाथ शिंदे आणि आनंदराज आंबेडकर यांच्यात मुंबई पालिकेच्या जागावाटपाची चर्चा, भाजपला सुप्त इशारा!!
- निवडणुका जिंकणे युती किंवा आघाडीवर अवलंबून नाही; ते कार्यकर्त्यांच्या बळावर अवलंबून; प्रकाश आंबेडकरांचा वंचितला मंत्र
- भाजप आणि पवारांच्या वेगवेगळ्या बेरजेच्या राजकारणात कार्यकर्त्यांच्या वजाबाकीचा धोका; मतदारांना गृहीत धरल्याचा सुद्धा बसू शकतो फटका!!
- Delhi High Court : दिल्ली हायकोर्टाने म्हटले-हवा आणीबाणीसारखी, एअर प्युरिफायरवर 18% GST का? हा स्वच्छ नसेल तर कर कमी करा