विशेष प्रतिनिधी
मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली त्रिभाषा सूत्रासंदर्भात आज मुंबई येथील शासकीय निवासस्थानी आढावा बैठक संपन्न झाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले की, त्रिभाषा सूत्रासंदर्भात साहित्यिक, भाषा तज्ज्ञ, राजकीय नेते आणि इतरही सर्व संबंधितांशी चर्चा करुनच अंतिम निर्णय घेण्यात येईल.
या विषयावर सांगोपांग चर्चा झाल्यानंतर सर्व राज्यांची स्थिती सर्वांसमोर मांडावी, नवीन शैक्षणिक धोरणांतर्गत मराठी मुलांचे अकॅडेमिक बँक ऑफ क्रेडिटच्या अनुषंगाने नुकसान होऊ नये, यांसह इतरही पर्यायांवर सर्वांसाठी समग्र सादरीकरण करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. मराठी भाषेचे अभ्यासक, साहित्यिक, राजकीय नेते यासह सर्व संबंधितांसमोर याचे सादरीकरण आणि सल्लामसलतीची प्रक्रिया राबविण्यात यावी, असे या बैठकीत ठरले. ही सल्लामसलतीची प्रक्रिया पूर्ण झाल्यावरच अंतिम निर्णय घेण्यात येईल, असेही यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. त्यामुळे शालेय शिक्षणमंत्री दादाजी भुसे हे आता पुढची सल्लामसलतीची प्रक्रिया प्रारंभ करणार आहेत.
या बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे, राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर, महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेचे संचालक आणि शिक्षण विभागातील अधिकारी उपस्थित होते.
Final decision on trilingual formula will be taken after talking to all concerned; Devendra Fadnavis assures
महत्वाच्या बातम्या
- नागपूरकरांची स्वप्नपूर्ती; आर्थिक दुर्बल घटकांना 480 घरे वाटप; महाराष्ट्र बेघरमुक्त करण्याच्या दिशेने मार्गक्रमण
- World War III : तिसऱ्या महायुद्धाच्या धोक्याची घंटा वाजली! आता चीन अन् रशिया कोणते मोठे पाऊल उचलणार?
- IndiGo flight : ‘मेडे’ कॉलनंतर चेन्नईला जाणाऱ्या इंडिगोच्या विमानाचे आपत्कालीन लँडिंग
- RCB wins : RCBने ट्रॉफी जिंकल्यानंतर बंगळुरूमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीतून BCCIने घेतला धडा!