आलियाच्या ‘कन्यादान’ ब्रायडल वेअर जाहिरातीवरील वाद वाढत आहे. मुंबईतील सांताक्रूझ पोलिस स्टेशनमध्ये एका व्यक्तीने आलिया भट्टविरोधात ब्रायडल वेअर कंपनीविरोधात तक्रार दाखल केली आहे.Filed a complaint against Alia Bhatt, accused of hurting the feelings of Hindus
विशेष प्रतिनिधी
मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्टविरोधात मुंबईत तक्रार दाखल करण्यात आली आहे. एका टीव्ही जाहिरातीमुळे ती कायदेशीर अडचणीत सापडली असल्याचं म्हटल जातय.
आलियाच्या ‘कन्यादान’ ब्रायडल वेअर जाहिरातीवरील वाद वाढत आहे. मुंबईतील सांताक्रूझ पोलिस स्टेशनमध्ये एका व्यक्तीने आलिया भट्टविरोधात ब्रायडल वेअर कंपनीविरोधात तक्रार दाखल केली आहे आणि गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.
हिंदू धर्माच्या भावना दुखावल्याचा आरोप
या जाहिरातीदरम्यान तिने विवाह सोहळ्यातील कन्यादानाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. मुलीला परक्याचे धन का मानले जाते? असा प्रश्न तिने विचारला आहे. “मुलगी ही दान करण्याची गोष्ट नाही, त्यामुळे कन्यादान नाही कन्यामान,” असा संदेश या व्हिडीओतून देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
तक्रारदाराने आपल्या याचिकेत म्हटले आहे की, आलिया भट्टची ही जाहिरात हिंदूंच्या भावना दुखावत आहे, कारण यात कन्यादान प्रतिगामी पद्धतीने दाखवण्यात आले आहे. त्यामुळे कंपनी आणि आलिया भट्ट यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी आहे.
Filed a complaint against Alia Bhatt, accused of hurting the feelings of Hindus
महत्त्वाच्या बातम्या
- शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना जेल मध्ये टाकण्याचा प्रयत्न करणाऱ्या विरोधात आमची लढाई , भुजबळ यांना पालकमंत्री पदावरून हटवा, शिवसेना आमदार सुहास कांदे यांची मागणी
- मुंबईत आणखी एका संशयित दहशतवाद्यास एटीएसकडून अटक
- Bollywood Drugs Case: NCB ची मोठी कारवाई ! सुशांतचा मित्र तर राज कुंद्रा-शिल्पा शेट्टीच्या रेस्तराँचा डायरेक्टर कुणाल जानीला अटक
- रिव्यू : एक थी बेगम २, अनुभवा पहिल्या सिजन पेक्षाही अधिक थ्रिलर