विशेष प्रतिनिधी
नागपूर : Aditya Thackeray मराठी माणसाला दाबण्याचा प्रयत्न केला तर महाराष्ट्र द्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे. दादागिरी केली तर त्याला पोलिसांनी दांडका दाखवला पाहिजे, अशी मागणी आदित्य ठाकरे यांनी केली.Aditya Thackeray
कल्याणमधील हायफाय सोसायटीत झालेल्या मराठी कुटुंबावरील हल्ल्यावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आदित्य ठाकरे यांनी प्रचंड संताप व्यक्त केला आहे. मराठी माणसावर हल्ला करणाऱ्यांवर महाराष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबतची आज घोषणा केली पाहिजे, अशी मागणी करतानाच मराठी माणसावर हल्ला करणाऱ्या सोसायट्यांची ओसीच रद्द करण्याचा कायदा आणा, अशी मागणीही आदित्य ठाकरे यांनी केली आहे.
आदित्य ठाकरे म्हणाले, अनेक भाषिक, अनेक धर्मीय लोक मुंबईत राहतात. महाराष्ट्रात राहतात. सर्वजण गुण्यागोविंदाने राहतात. यापूर्वी मराठी-अमराठी हे वाद कधी नव्हते. व्हेज-नॉनव्हेज हे कुठून आलं? यापूर्वी असं नव्हतं. आम्ही हिंदूधर्मीय आहोत. आम्ही मटणमच्छी खातो. इतके दिवस हा प्रकार नव्हता. आता हा प्रकार कुठून आला? आमची मागणी ही आहे की कालचा जो वाद झाला. राज्यात कोणी व्हेज सोसायटी करत असेल तर त्याची ओसी रद्द केली पाहिजे? मराठी माणसाला घर दिलं नाही तर ओसी अशा सोसायटीला ओसी देऊ नका.अशा हौसिंग सोसायटीवर कारवाई झाली पाहिजे.
हे मुख्यमंत्री महाराष्ट् प्रेमी असतील, या मातीतील असतील तर आमच्या मागणीला मान देऊन महाराष्ट्रद्रोहाचा कायदा आणतील. हौसिंग सोसायटी एरियाची नावे बदलत आहेत. बिल्डरही विभागांची नावे बदलत आहेत. अप्पर कफ परेड, अप्पर वरळी अशी नावे ठेवत आहेत. शिवरी लिहितात. शिवडी लिहा. परेल लिहितात, परळ लिहा. अशी नावे बदलणाऱ्या बिल्डरवर गुन्हे दाखल केले पाहिजे. आणि यावर भाजपने उत्तर द्यायला पाहिजे, असं आदित्य ठाकरे म्हणाले. मराठी नावं बदलू नका. असं करणाऱ्या बिल्डरला तुरुंगात टाका. ही टेस्ट केस असते. भाजपच्याच राज्यात असं का होतं? याचं उत्तर मिळायला हवं, अशी मागणी त्यांनी केली.
File Maharashtra droh case against those trying to oppress Marathi people, Aditya Thackeray’s demand
महत्वाच्या बातम्या
- Kulgam : कुलगाममध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, 5 दहशतवादी ठार
- Mukesh Rajput : भाजपचे दोन खासदार पायऱ्यांवरून पडले; मुकेश राजपूत आयसीयूमध्ये दाखल, सारंगींवरही उपचार सुरू
- Shivraj Singh Chouhan : ‘राहुल गांधी विरोधी पक्षनेते होण्याच्या लायक नाहीत’, शिवराज सिंह चौहान यांचा हल्लाबोल!
- Good News : कैलास मानसरोवर यात्रा पुन्हा सुरू होणार!