प्रतिनिधी
मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या उठावानंतर शिवसेनेला फार मोठे खिंडार पडले. आपल्या जवळ दोन तृतीयांश बहुमत असल्यामुळे आपली शिवसेना ही खरी शिवसेना असल्याचा दावा शिंदे गटाने केला आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी आपल्या कार्यकर्त्यांना सज्ज राहण्याचे आवाहन केले आहे. Fight for Shivsena symbol intensifies between Uddhav Thackeray faction and eknath shinde faction
नवीन चिन्हाची तयारी ठेवा आणि ते लवकरात लवकर लोकांपर्यंत पोहोचवा, असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी केले आहे. एवढे असून शिंदे गटाने तडजोडीची तयारी दाखवली असून अद्याप वेळ गेलेली नाही उद्धव ठाकरे यांनी सुवर्णमद्धे काढावा भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाशी बोलून शिवसेना पक्ष आणि शिवसेनेचे धनुष्यबाण चिन्ह वाचवावे भाजप सेना युतीचे सरकार स्थापन झालेच आहे या सरकारला आशीर्वाद द्यावेत असे आवाहन शिंदे गटाचे प्रवक्ते आमदार दीपक केसरकर यांनी केले आहे.
Uddhav Thackeray : भाजपवर हल्लाबोल करताना मुख्यमंत्र्यांच्या तोंडी काँग्रेसचीच भाषा!!
गाफील राहू नका…
राज्यातील सत्तासंघर्षावर 11 जुलै रोजी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. त्यामुळे शिंदे गटाला अधिकृत पक्षाची मान्यता मिळणार का, याकडे सगळ्यांचे लक्ष लागलेले असतानाच उद्धव ठाकरे यांनी आपल्या कार्यकर्त्यांना आवाहन केले आहे. कायद्याने जो काही लढा द्यायचा असेल तो आम्ही देऊ पण दुर्दैवाने त्या लढाईत अपयश आलं तर कोणीही गाफील राहू नका. शिवसेनेला मिळणारं नवं चिन्ह कमी अवधीत घरोघरी पोहोचवा, अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना संबोधित केले आहे. त्यामुळे आता शिवसेना आपल्या पक्षाचे अधिकृत चिन्ह गमावणार का, अशा चर्चा सुरू झाल्या आहेत.
– धनुष्यबाण वाचवण्याचे प्रयत्न
उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून शिंदे गटातील 16 आमदारांवर अपात्रतेची कारवाई करण्याची याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. या याचिकेवर 11 जुलै रोजी सुनावणी होणार आहे. जर हे 16 आमदार अपात्र ठरले नाहीत तर शिंदे गटाला शिवसेना विधीमंडळ गट म्हणून अधिकृत मान्यता मिळेल. त्यानंतर पक्षाच्या चिन्हावर शिंदे गट दावा करू शकते, असे बोलले जात आहे. त्यामुळे आता उद्धव ठाकरेंना शिवसेना, शिवसेनेचे चिन्ह धनुष्यबाण वाचवण्याचे शिवधनुष्य उचलावे लागणार आहे, अशी चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे.
Fight for Shivsena symbol intensifies between Uddhav Thackeray faction and eknath shinde faction
महत्वाच्या बातम्या
- आदित्य ठाकरेंची निष्ठा यात्रा : शिवसेनेतील गळती रोखण्यासाठी, खिंडार बुजवण्यासाठी सिमेंटिंग फोर्स!!
- हेट पोस्ट : सोशल मीडियावरील धार्मिक तेढ वाढवणाऱ्या पोस्ट महाराष्ट्र पोलिसांच्या रडारवर!!
- औरंगाबाद नामांतराला विरोध : महाविकास आघाडीच्या शेवटाचे स्क्रिप्ट, काँग्रेस – राष्ट्रवादीचा एक्झिट प्लॅन!!
- चहावाला पंतप्रधान, रिक्षावाला मुख्यमंत्री!!; ठाण्यात रिक्षाचालकांनी लावलेत अभिमान फलक!!