वृत्तसंस्था
पुणे : चाकण औद्योगिक वसाहतीमधील संतोषनगर येथील टाटा – डीएलटी कंपनीच्या कंटेनर गाडीच्या यार्डला भीषण आग लागली. त्या आगीत 20 पेक्षा अधिक कंटेनर गाड्या खाक झाल्या आहेत. रविवार आणि लॉकडाऊनमुळे सर्व बंद होते. त्यामुळे जीवितहानी टळली आहे.Fierce fire in Chakan industrial estate;Burn twenty containers of Tata-DLT
आगीसह धुराचे लोट उसळल्याने आगीवर नियंत्रण मिळवणे कठीण झाले. परंतु अग्निशमन दलाच्या तीन गाड्यानीअखेर आग आटोक्यात आणली.माळरान, डोंगराळ भागात उन्हामुळे वणवे पेटू लागले आहेत. त्यामुळे परिसरात आगीच्या घटना घडू लागली आहेत. नागरिकांनी दक्षता बाळगावी, असे आवाहन अग्निशमन दलाने केले.
शहर ,जिल्ह्यातील आगीच्या काही घटना
- गॅस लाईनच्या लिकेजमुळे कात्रज भागात आग.
- कॅम्प भागातील फॅशन स्ट्रीट येथे लागलेल्या भीषण आगीत 400 हून अधिक दुकाने जाळून खाक.
- रविवारी( ता.18 )सकाळी बारामती येथे भंगाराच्या गोदामाचे भीषण आगीत मोठ नुकसान.