• Download App
    ग्रामीण भागापेक्षा शहरी भागात महिलात वंध्यत्वाचे वाढते प्रमाण - प्रदूषण, ताणतणाव, व्यसनाधीनता, फास्टफूडचा परिणाम|Fertality issue increasing in metropolitan cities expert openion

    ग्रामीण भागापेक्षा शहरी भागात महिलात वंध्यत्वाचे वाढते प्रमाण ; प्रदूषण, ताणतणाव, व्यसनाधीनता, फास्टफूडचा परिणाम

    ग्रामीण भागापेक्षा शहरी भागात महिलात वंध्यत्वाचे वाढते प्रमाण दिसून येत आहे. प्रदूषण, ताणतणाव, व्यसनाधीनता, फास्टफूडचा परिणामामुळे जे घडत असल्याचे तज्ञाचे मत आहे.


    विशेष प्रतिनिधी 

    पुणे – बदलत्या जीवनशैलीमुळे महिला आणि पुरुषात  ‘वंध्यत्वाचे’ प्रमाणात वाढ हाेत आहे. ग्रामीण भागातील महिलांची जीवन पध्दती आणि शहरी भागातील महिला व पुरुषांची जीवनशैली यात दिवसेंदिवस तफावत दिसून येऊ लागली आहे. शहरी भागातील प्रदूषण, ताणतणाव, वाढती व्यसनाधीनता, फास्टफूड, धकाधकीचे जीवन यामुळे ग्रामीण भागातील महिलांपेक्षा शहरी भागातील महिला व पुरुषांचे वंध्यत्व वाढत असल्याची माहिती ओएॅसिस फर्टीलिटी क्लिनकचे प्रमुख डाॅ.निलेश बलकवडे यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. Fertality issue increasing in metropolitan cities expert openion

    बलकवडे म्हणाले, राष्ट्रीय वंध्यत्व जागरुकता सप्ताहाच्या अनुषंगाने महिलांना माृत्वाच्या प्रवासात साथ देण्याच्या उद्देशाने ‘मला आई व्हायचंय’ हा माेफत मार्गदर्शन उपक्रम राबविण्यात येणार आहे. अनेक प्रयत्न करुनही मुल न हाेत असलेल्यांचे पालकत्याचे स्वप्न पूर्ण करताना त्यांना नेमक्या काेणत्या अडचणी येतात त्याबाबत याद्वारे जनजागृती करुन मार्गदर्शन करण्यात येणार आहे.



    भारतात दर सहा जाेडप्यांमागे एकाला वंध्यत्वाची समस्या आहे. वंध्यत्वावर मात करत पालकत्व मिळण्यासाठी उपचार आणि प्रक्रिया आवश्यक असते. इलेक्ट्राॅनिक विटनेसिंग सिस्टीम द्वारे बीज शुक्राणू तसेच गर्भाचे शीत संरक्षण हे अद्यावत तंत्रज्ञान उपलब्ध असून त्याद्वारे वंध्यत्वावर मात करता येऊ शकते. फर्टीलीटी प्रिझर्व्हेशन टेक्नाॅलाॅजी,

    कर्कराेगाच्या रुग्णांना कर्कराेगाच्या उपचारापूर्वी त्यांची प्रजनन क्षमता टिकवून ठेवण्यास मदत करते. तसेच त्यांना त्यांच्या साेयीनुसार भविष्यात गर्भधारणा करण्यास सक्षम करते. अनुवांशिक दाेष निवारणासाठी प्रीप्लांटेशन अनुवांशिक चाचणी हे एक प्रगत तंत्रज्ञान विकसित झाले आहे. भारतीय महिलांमध्ये अंडाशय व बीजाची गुणवत्ता ३० ते ३५ या कमी वयातच निर्माण हाेऊ लागली आहे ही चिंतेची बाब आहे.

     Fertality issue increasing in metropolitan cities expert openion

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस