वृत्तसंस्था
ठाणे : ठाण्यात मंगळवारी पहाटे एक भीषण अपघात झाला. ठाण्यातील शहापूरजवळ गर्डर लॉन्चिंग मशीन पडले. मशिन पडल्याने 14 जणांचा मृत्यू झाला तर तीन जण जखमी झाले.Fatal accident on Samriddhi Express Highway in Thane, 15 killed as girder machine falls, death toll feared to rise
समृद्धी एक्सप्रेस हायवेवर अपघात
शहापूर पोलिसांनी सांगितले की, समृद्धी एक्स्प्रेस हायवेच्या तिसऱ्या टप्प्याचे बांधकाम सुरू असून, त्यात मशिनचा वापर केला जात होता.
- पाकिस्तानात ईशनिंदेचा बळी ठरली आणखी एक व्यक्ती, जमावाने पोलिस ठाण्यात घुसून केलेल्या मारहाणीत मृत्यू
या अपघातात 15 जणांचा मृत्यू
ठाण्यातील शाहपूरजवळ गर्डर लॉन्चिंग मशिन कोसळून 15 जणांचा मृत्यू झाला असून 3 जण जखमी झाल्याची माहिती शहापूर पोलिसांनी दिली. समृद्धी द्रुतगती महामार्गाच्या तिसऱ्या टप्प्याच्या बांधकामात या मशिनचा वापर केला जात होता.
समृद्धी महामार्गाच्या तिसऱ्या टप्प्याचे काम सुरू आहे. रात्रीही काम सुरु होते, तेव्हाच ही दुर्देवी घटना घडली. शाहपूर सरलांबे येथे ही घटना घडली आहे. सुरक्षेची कोणताही उपाययोजना नसल्याने मजुरांचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गर्डर मशीनला जोडणारी क्रेन आणि स्लॅब सुमारे 100 फूट उंचावरून मजुरांवर कोसळले. आतापर्यंत 15 मृतदेह शाहपूर उपजिल्हा रुग्णालयात आणले आहेत. तीन ते चार जण जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
मृतांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे. अंधार असल्याने गर्डर आणि मशीनखाली नेमके किती जण दबले आहेत किंवा मृतांचा निश्चित आकडा किती आहे, हे सांगता येऊ शकत नाही.
समृद्धी महामार्गाचे दोन टप्पे सुरू झाले आहेत. नागपूर ते इगतपुरीपर्यंत सध्या हा महामार्ग सुरू आहे. समृद्धी महामार्गाचा शेवटचा आणि तिसरा टप्पा येत्या डिसेंबर 2023 पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे. हा शंभर किलोमीटरचा टप्पा आहे.
डिसेंबर 2022 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिर्डी ते नागपूर दरम्यानच्या 520 किमी लांबीच्या समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन केले होते. त्यानंतर प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्याचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी केले. नागपूर ते इगतपुरी तालुक्यातील भरवीर गावापर्यंतचा एकूण 600 किमीचा रस्ता खुला झाला आहे.
Fatal accident on Samriddhi Express Highway in Thane, 15 killed as girder machine falls, death toll feared to rise
महत्वाच्या बातम्या
- समृद्धी महामार्गावर भीषण दुर्घटना! शहापूर येथे गर्डरसह क्रेन कोसळल्याने १५ कामगारांचा मृत्यू
- Lok Sabha Elections 2024 : पंतप्रधान मोदींनी ‘NDA’ खासदारांना लोकसभा निवडणुकीसाठी दिला कानमंत्र!
- 2015 मधले भाकीत 2023 मध्ये ठरले खरे; देशातले सर्वांत मोठे राजकीय हवामान तज्ञ आज मोदींबरोबर व्यासपीठावर!!
- Land For Job Scam प्रकरणात ‘ED’चा लालूंना दणका, सहा कोटींची मालमत्ता जप्त!