• Download App
    बुलडाण्यात दोन लक्झरी बसेसचा भीषण अपघात; 5 जण ठार, तर 22 जण जखमी |Fatal accident involving two luxury buses in Buldane; 5 people were killed and 22 people were injured

    बुलडाण्यात दोन लक्झरी बसेसचा भीषण अपघात; 5 जण ठार, तर 22 जण जखमी

    प्रतिनिधी

    मलकापूर : राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा वरील लक्ष्मी नगर जवळील उड्डाणपुलावर शनिवारी पहाटे 2 ते ३ वाजेदरम्यान दोन लक्झरी बसेसचा भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत 5 प्रवाशांचा मृत्यू झाला असून, तब्बल 22 प्रवाशी जखमी झाले आहेत.Fatal accident involving two luxury buses in Buldane; 5 people were killed and 22 people were injured

    अमरनाथ यात्रा करून हिंगोलीकडे परतणाऱ्या बालाजी ट्रॅव्हल्स क्रमांक (एम एच 08 9458) तर नागपूरकडून नाशिककडे जात असलेल्या रॉयल ट्रॅव्हल्स (क्र. एम.एच.27 बीएक्स 4466) या दोन्ही वाहनांचा भीषण अपघात झाला.



    या अपघातात 5 जण जागीच ठार झाले असून दोन्ही ट्रॅव्हल्समध्ये असणाऱ्या प्रवाशांपैकी 22 जण गंभीर जखमी झाले. त्यांना प्राथमिक उपचार करिता उपजिल्हा रुग्णालय मलकापूर येथे दाखल केले असता त्यांना पुढील उपचाराकरिता बुलढाणा येथे रेफर करण्यात आल्याची प्राथमिक माहिती आहे.

    अपघाताची माहिती मिळताच डीवाय एसपी दयाराम गवई, पोलीस निरीक्षक अशोक रत्नपारखी, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक तायडे यांच्या सह कर्मचारी दाखल झाले. मलकापूर पोलीस कर्मचारी तथा परिसरातील विविध नागरिक मदतीला घटनास्थळी दाखल झाले. त्यामुळे या अपघातातील अनेकांना तत्काळ उपचारार्थ हलविण्यात येऊन अनेकांची प्राण वाचले. झालेल्या अपघातामुळे रस्त्यांवर वाहनांच्या रांगा लागून वाहतूक ठप्प झाली होती. एक तासाच्या कालावधीनंतर वाहतूक सुरळीत करण्यात आली.

    घटनेचे गांभीर्य लक्षात घेत बुलढाणा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक सुनील कडासने घटनास्थळी दाखल झाले. कुठल्याही क्षणाचा विलंब न करतात तत्काळ घटनास्थळी दाखल होऊन मलकापूर शहर पोलिसांनी जखमींना आपल्या वाहनात रुग्णवाहिकेप्रमाणेच उपचारअर्थ तत्काळ हलविले व आपल्या कर्तव्यासोबतच माणुसकीचे दर्शन घडविले.

    Fatal accident involving two luxury buses in Buldane; 5 people were killed and 22 people were injured

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    Devendra Fadnavis : जगाला हेवा वाटेल असे ‘ज्ञानपीठ’ आळंदी येथे उभारणार – देवेंद्र फडणवीस

    Tapti Mega Recharge : ताप्ती मेगा रिचार्ज प्रकल्पाबाबत महाराष्ट्र-मध्यप्रदेशात ऐतिहासिक करार!

    मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले- ठाकरे सरकार नसते तर दीड वर्षे आधीच मेट्रो आली असती; मुंबई मेट्रो लाईन-2 सेवेचा शुभारंभ