• Download App
    शेतकऱ्यांचे खाते होल्ड, फटके देऊन सरळ करावे लागेल; आमदार श्वेता महाले यांचा रुद्रावतार Farmers' account hold by bank , MLA Shweta Mahale is angry

    शेतकऱ्यांचे खाते होल्ड, फटके देऊन सरळ करावे लागेल; आमदार श्वेता महाले यांचा रुद्रावतार

    विशेष प्रतिनिधी

    बुलढाणा : अतिवृष्टीची मिळालेली मदत आणि पिकविम्याची आलेली नुकसान भरपाई शेतकऱ्यांना न देता परस्पर शेतकऱ्यांच्या पीक कर्ज खात्यात वळती केली किंवा त्या खात्याला होल्ड लावणाऱ्या चांडोळ येथील बँक व्यवस्थापकास आमदार श्वेता महाले यांनी चांगलेच धारेवर धरले. एकेरी भाषेत झापले. Farmers’ account hold by bank , MLA Shweta Mahale is angry

    यावेळी मॅनेजरला माफी मागायला लावली.आमदार महाले या शेतकऱ्यांच्या खात्याला होल्ड का लावला म्हणून चांडोळ येथील बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये गेल्या होत्या. यावेळी महाले यांनी मॅनेजरला धारेवर धरत शेतकऱ्यांच्या खात्याला लावलेला होल्ड काढण्यास भाग पाडले. यावेळी आमदार महाले यांनी मॅनेजरला मारण्याची भाषा ही केली.


    चिखली : भाजप आमदार श्वेता महालेंसह ३० कार्यकर्त्यांवर आज गुन्हा दाखल


    बुलडाणा जिल्ह्यातील चांडोळ येथील बँक ऑफ महाराष्ट्रचे व्यवस्थापक विरुध्द अनेक शेतकऱ्यांनी त्यांच्या मनमानीसह उद्धट वागणुकीबद्दल तक्रारी केल्या आहेत.
    शेतकऱ्यांना अतिवृष्टीची मिळालेली मदत आणि पीक विम्याचे आलेले पैसे न देता त्यांचे पैसे शासनाची कोणतीही परवानगी न घेता बेकायदेशीरपणे परस्पर कर्ज खात्यात जमा केल्या जात होते.

    त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र असंतोष पसरत चालला होता. या बँक व्यवस्थापकास अनेकदा फोन करून समज दिली तरीही आमदार श्वेता महाले यांचे त्यांनी ऐकले नाही, तर त्यांच्या वरीष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रारी केल्या, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक यांना सांगून ही सदर बँक व्यवस्थापकाचा कारभार सुधारला नसल्याने आमदार श्वेता महाले यांनी नुकताच बँकेत जाऊन व्यवस्थापकास घेराव घालून जाब विचारला. यावेळी त्याला आमदारांनी चांगलेच झापले, यावेळी असंख्य शेतकरी उपस्थित होते. आमदारांच्या या अवतारानंतर बँकेने लावलेला होल्ड काढला आणि आता शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काचे पैसे मिळण्यास सुरुवात झाली.

    Farmers’ account hold by bank , MLA Shweta Mahale is angry

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस