• Download App
    प्रसिद्ध नाटककार जयंत पवार यांचे निधन |Famous playwright Jayant Pawar passes away

    प्रसिद्ध नाटककार जयंत पवार यांचे निधन

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई: संवेदनशील लेखक, प्रसिद्ध नाटककार आणि पत्रकार जयंत पवार यांचे निधन झाले आहे. ते ६१ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी पत्रकार, लेखिका संध्या नरे व मुलगी असा परिवार आहे.पवार यांना रात्री अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र, उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.Famous playwright Jayant Pawar passes away

    ‘काय डेंजर वारा सुटलाय’ या नाटकासाठी जयंत पवार यांना सर्वोत्कृष्ट लेखनासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने घेतलेल्या स्पर्धेत प्रथम पारितोषिक मिळाले होते. महाड येथे झालेल्या १५ व्या कोकण मराठी साहित्य परिषदेच्या साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद जयंत पवार यांनी भूषवले होते. ‘फिनिक्सच्या राखेतून उठला मोर’ या कथासंग्रहासाठी २०१२ साली साहित्य अकादमी पुरस्काराने त्यांना गौरवण्यात आले होते.



    जयंत पवार यांचे साहित्य:

    • अधांतर
    • काय डेंजर वारा सुटलाय
    • टेंगशेच्या स्वप्नात ट्रेन (दीर्घांक)
    • दरवेशी (एकांकिका)
    • पाऊलखुणा (वंश या नाटकाचे व्यावसायिक रूप)
    • फिनिक्सच्या राखेतून उठला मोर (कथासंग्रह)
    • बहुजन संस्कृतिवाद आणि लेखक (भाषाविषयक)
    • माझे घर
    • वरनभातलोन्चा नि कोन नाय कोन्चा (कथासंग्रह)
    • वंश
    • शेवटच्या बीभत्साचे गाणे (दीर्घांक)होड्या (एकांकिका).

    Famous playwright Jayant Pawar passes away

    Related posts

    Tata Cancer Hospital : मुंबईतील टाटा कॅन्सर हॉस्पिटलला धमकीचा मेल, पोलिसांनी तपास सुरू केला

    CM Fadnvis : सायबर गुन्हे घडण्यापूर्वीच रोखण्यासाठी जनजागृती आवश्यक – मुख्यमंत्री फडणवीस

    Devendra Fadnavis : महाराष्ट्र शासन अन् विधि सेंटर फॉर लिगल पॉलिसी यांच्यात सामंजस्य करार