प्रतिनिधी
बीड : बीड जिल्ह्याच्या राजकारणात कौटुंबिक वाद नवे नाहीत. पण ते प्रामुख्याने आतापर्यंत राजकीय स्वरूपाचे राहिले आहेत. मुंडे कुटुंबातला वाद, क्षीरसागर कुटुंबातला राजकीय वाद हे नेहमी चर्चेचे विषय असतात. पण आता त्या पलीकडे जाऊन क्षीरसागर कुटुंबामधला वाद थेट पोलीस स्टेशनमध्ये जाऊन धडकला आहे. Family dispute of NCP MLA in police station
राष्ट्रवादी काँग्रेसचे बीड विधानसभा मतदारसंघाचे आमदार संदीप क्षीरसागर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संदीप क्षीरसागर यांनी आपल्याला धक्के मारून घराबाहेर काढले, असा आरोप त्यांचे वडील रवींद्र क्षीरसागर यांनी केल्यामुळे पोलिसांनी संदीप क्षीरसागर यांच्या विरुद्ध अदाखलपात्र गुन्हा दाखल केला आहे.
संदीप क्षीरसागर यांचे वडील रवींद्र क्षीरसागर यांनी या प्रकरणी बीडमधील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानंतर पोलिसांनी संबंधित कारवाई केली आहे.
शिवाजीनगर पोलिसांनी संदीप क्षीरसागर यांच्याविरोधात अदाखलपात्र गुन्हा दाखल केला आहे. रवींद्र क्षीरसागर यांनी आपल्या दुसऱ्या मुलाविरोधातही फिर्याद दिली आहे. त्यामुळे संदीप क्षीरसागर यांच्यासह त्यांचे भाऊ अर्जुन क्षीरसागर यांच्यावर देखील गुन्हाची नोंद आहे. क्षीरसागर बंधूंवर कलम 323, 504, 506, 34 अंतर्गत सदरील गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी पुढील तपास शिवाजीनगर पोलीस करीत आहेत. कौटुंबिक कारणावरून संदीप क्षीरसागर आणि अर्जुन क्षीरसागर या दोघा भावांनी वडील रवींद्र क्षीरसागर यांना धक्काबुक्की करून घराबाहेर काढण्याचा प्रकार घडला आणि या वरून स्वतः रवींद्र क्षीरसागरांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात ही तक्रार दिली आहे. दरम्यान या घटनेनंतर बीडच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे.
क्षीरसागर काका-पुतण्यांचा वाद सर्वश्रूत
क्षीरसागर कुटुंबातून सातत्याने वादाच्या बातम्या समोर येत असतात. बीडमधील क्षीरसागर कुटुंबातील काका-पुतण्याचा वाद सर्वश्रूत आहे. ज्येष्ठ नेते जयदत्त क्षीरसागर हे संदीप क्षीरसागर यांचे काका आहेत. जयदत्त हे विधीमंडळात होते तर त्यांचे बंधू रवींद्र क्षीरसागर हे स्थानिक स्वराज्य संस्था तसेच कारखान्यातील राजकारणात सक्रीय असत. पुढे रवींद्र क्षीरसागर यांचे पुत्र संदीप क्षीरसागर हे देखील राजकारणात आले. त्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांमधून राजकीय कारकीर्द सुरु केली. पण त्यांना आमदार व्हायचं होतं. त्यातून काही वर्षापूर्वी जयदत्त क्षीरसागर आणि संदीप क्षीरसागर या दोन्ही काका-पुतणे यांच्यात वाद झाला. नंतर क्षीरसागर कुटुंबात वाद सातत्याने सुरुच आहेत.
Family dispute of NCP MLA in police station
महत्वाच्या बातम्या
- हेट स्पीचप्रकरणी राहुल गांधींची पाटणा कोर्टात हजेरी, सुशील मोदींनी दाखल केला होता खटला; सुरत कोर्टाकडून यापूर्वीच शिक्षा
- ट्विटरचे एक्स कॉर्पमध्ये विलीनीकरण होण्याची शक्यता, एलन मस्क यांचे सूचक ट्विट, 20 एप्रिलला हटणार ब्लू टिक
- लाऊडस्पीकरवर अजानला बंदी, आज जनहित याचिकेवर गुजरात हायकोर्टात सुनावणी; राज्य सरकार सादर करणार उत्तर
- वज्रमुठीची बोटे ढिल्ली पडल्यानंतर 82 वर्षाचा तरुण वज्रमुठ सभेला संबोधित करण्याची चर्चा!!