नागपूर पोलिसांत तक्रार दाखल; गडकरींच्या ट्वीटद्वारे देण्यात आली माहिती
विशेष प्रतिनिधी
नागपूर : राज्यभरात चर्चेच्या केंद्रस्थानी राहिलेल्या पुण्यातील कसबा मतदारसंघ पोटनिवडणुकीचा निकाल काल लागला. यामध्ये महाविकास आघाडीचे रविंद्र धंगेकर हे विजयी झाले आहेत. त्यांनी ११ हजार ४० मतांनी भाजपाच्या हेमंत रासने यांचा पराभव केला. या निकालावर विविध प्रतिक्रिया उमटत आहेत विरोधक भाजपावर टीका करत आहेत. दरम्यान आता कसबा मतदारसंघात निवडणूक निकालाबाबत केंद्रीयमंत्री नितीन गडकरींच्या नावाने व्हॉट्स ॲप ग्रूपवर खोटी आणि दिशाभूल करणारी वक्तव्ये व्हायरल होत असल्याचा प्रकार समोर आला आहे. False and misleading statements on WhatsApp group in Gadkari’s name regarding Kasba election results go viral
याबाबत केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांच्या अधिकृत ऑफिशियल ट्वीटरद्वारे माहिती देण्यात आली आहे. ‘’पुण्यातील कसबा निवडणूक निकालाबाबत केंद्रीयमंत्री नितीन गडकरींच्या नावाने व्हॉट्स ॲप ग्रूपवर खोटे आणि दिशाभूल करणारी वक्तव्ये व्हायरल केली जात आहेत.’’ असं म्हटलं आहे.
याचबरोबर ‘’या संदर्भात नागपूर पोलिसांकडे तक्रार करण्यात आली असून गडकरींच्या नावाने अशा प्रकारे खोट्या आणि दिशाभूल करणाऱ्या बातम्या पसरवणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याची विनंती नागपूर पोलिसांना करण्यात आली आहे.’’ अशी माहितीही देण्यात आली आहे.
महाविकास आघाडीचे रविंद्र धंगेकर हे मतमोजणीच्या पहिल्या फेरीपासून आघाडीवर होते, त्यांची आघाडी शेवटपर्यंत कायम राहिली. रविंद्र धंगेकर यांना ७२ हजार ५९९ मतं मिळाली आहेत. तर हेमंत रासने यांना ६१ हजार ७७१ मतं मिळवता आली. मागील २८ वर्षांपासून कसबा मतदारसंघ हा भाजपाचा गड राहिला होता. यंदा मात्र तो काँग्रेसच्या ताब्यात गेला आहे. धंगेकरांच्या विजयामुळे महाविकास आघाडीच्या गोटात आनंदाचे वातावरण आहे.
False and misleading statements on WhatsApp group in Gadkari’s name regarding Kasba election results go viral
महत्वाच्या बातम्या