• Download App
    एसटी संपामुळे खाजगी बस ऑपरेटर्सचे फावले; तिप्पट-चौपट भाड्याचा प्रवाशांना भुर्दंड!! । Fall of private bus operators due to ST strike; Triple or quadruple fare for passengers !!

    एसटी संपामुळे खाजगी बस ऑपरेटर्सचे फावले; तिप्पट-चौपट भाड्याचा प्रवाशांना भुर्दंड!!

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : एसटी कर्मचाऱ्यांचा संप चिघळून सुमारे २२० डेपोमधले कामकाज ठप्प झाले आहे. या संपाचा प्रवाशांना फटका बसला तरी प्रायव्हेट बस ऑपरेटरचे मात्र फावले आहे. त्यांनी प्रवाशांवर तिप्पट-चौपट भाडेवाढ लादली आहे. Fall of private bus operators due to ST strike; Triple or quadruple fare for passengers !!

    जिथे 100 रुपये तिकीट आहे ते 300 रुपये मोजून प्रवाशांना प्रवास करावा लागत आहे. पुणे-नगर चे भाडे ६०० पुढे गेले आहे. तसेच गाड्यांमध्ये जागा मिळत नाही त्यामुळे प्रवाशांना कोंबून प्रायव्हेट ऑपरेटर्स आपले उखळ पांढरे करून घेत आहेत.



    दीर्घ पल्ल्याच्या गाड्यांचे भाडे चौपट झाल्याच्या बातम्या आहेत. 900 ते 1000 हजार रुपये भाडे असणाऱ्या प्रवासाला तीन – साडेतीन चार हजारापर्यंत भाडे आकारल्याच्या बातम्या आहेत.

    संपावर तोडगा काढण्यासाठी दुपारपर्यंत अध्यादेश काढण्याचे आश्वासन ठाकरे सरकारने हायकोर्टात दिले आहे. परंतु कर्मचाऱ्यांची मुख्य मागणी एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करावे याबाबत मात्र ठाकरे सरकार कोणतीही ठोस भूमिका जाहीर करायला तयार नाही. त्यामुळे कर्मचारी देखील संपावर ठाम आहेत. पण संपाच्या निमित्ताने प्रवाशांवर खाजगी बस चालक मात्र तिप्पट चौपट भाड्याचा भुर्दंड आकारताना दिसत आहेत.

    Fall of private bus operators due to ST strike; Triple or quadruple fare for passengers !!

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Gold : सोन्याने नवा विक्रम केला प्रस्थापित, पहिल्यांदाच किंमत ९७ हजारांच्या जवळ पोहोचली

    अविश्वास ठरावाला तोंड देण्यापूर्वीच कर्जत जामखेड मध्ये रोहित पवार समर्थक नगराध्यक्षांचा राजीनामा; रोहित पवारांनी नगरपंचायतीची गमावली सत्ता!!

    Thackeray brothers ठाकरे बंधूंच्या व्हॅलेंटाईन गुलाबाला लांब लांब काटे; दोघांच्या सैनिकांनी फोडले वेगवेगळे फाटे!!