• Download App
    ... कदाचित त्यांची रात्रीची उतरली नसेल, फडणवीस यांचं गायकवाड यांना सडेतोड उत्तर Fadnavis's slpa answer to Gaikwad

    … कदाचित त्यांची रात्रीची उतरली नसेल! फडणवीसांचे शिवसेनेचे ‘तळीराम’ आमदार गायकवाडांना सडेतोड उत्तर

    वृत्तसंस्था

    नागपूर : ‘कोरोनाचे जंतू सापडले असते, तर देवेंद्र फडणवीस यांच्या तोंडात कोंबले असते’ असं वादग्रस्त विधान करणाऱ्या शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांना अखेर भाजपचे विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सडेतोड उत्तर दिले आहे.  ‘गायकवाड यांची रात्रीची उतरली नसेल म्हणून ते तसे बोलले असतील’, असा टोला फडणवीसांनी लगावला आहे. Fadnavis’s slpa answer to Gaikwad

    संजय गायकवाड यांनी केलेल्या विधानावर पत्रकारांनी देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया विचारली असता त्यांनी आपल्या शैलीत हे उत्तर दिले.



    फडणवीस म्हणाले, ‘कसं आहे, संजय गायकवाड यांची रात्रीची उतरली नसेल. त्यामुळे त्यांनी सकाळी सकाळी पत्रकार परिषद घेतली असावी. त्यांना माझ्या तोंडात कोरोना विषाणू टाकायचे असेल तर त्यांनी नीट मास्क व हॅन्डग्लोस घालावेत. कारण रात्रीची घेणाऱ्यांसाठी कोरोना विषाणू अधिक घातक असतो.

    बुलडाण्यात भाजप-शिवसैनिक भिडले

    शिवसैनिकांचा आरोप आहे की, भाजपाचे पदाधिकारी आमदार गायकवाड यांचा पुतळा जाळण्यासाठी आले होते. तेव्हा धर्मवीर आखाड्याचे अध्यक्ष तथा आमदारपुत्र कुणाल गायकवाड यांनी भाजपला रोखण्याचा प्रयत्न केला. यात दोन्ही गटात पकडापकडी झाली. नेते विजयराज शिंदे यांना खाली पाडून मारहाण केल्याचा आरोप भाजप करीत आहे.
    पोलिसांनी दोन्ही गटाना वेगळे केले.

    Fadnavis’s slpa answer to Gaikwad

    महत्वाच्या बातम्या वाचा

    Related posts

    मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले- ठाकरे सरकार नसते तर दीड वर्षे आधीच मेट्रो आली असती; मुंबई मेट्रो लाईन-2 सेवेचा शुभारंभ

    Dadar station : महाराष्ट्रात सतर्कता; दादर स्टेशनजवळ स्वामीनारायण मंदिरात पोलिसांकडून मॉक ड्रिल; मुख्यमंत्र्यांची बैठक

    Mumbai Metro ‘मुंबई मेट्रो मार्ग 3, टप्पा 2’ सेवेचा शुभारंभ ; फडणवीसांनी दाखवला हिरवा झेंडा