राजकारणात पूर्वी आपल्या एका फोनवर कामे होतात!! एक फोन फिरवला आणि काम झाले!!, अशी भाषा वापरली जायची. पण आता काळ बदलला आणि फोन न उचलता “राजकीय कामे” व्हायला लागलीत!! हा काळ आता उद्धव ठाकरेंनी आणला आहे. उद्धव ठाकरे हे महाराष्ट्राचे असे मुख्यमंत्री आहेत की जे फोन न उचलून दुसऱ्यांची “कामे” करून टाकतात!! ( त्याला राष्ट्रवादी काँग्रेस वाले करेक्ट कार्यक्रम करणे असे म्हणतात.) Fadnavis – What happened to Sambhaji Raje ??; Uddhav Thackeray picks up the phone
उद्धव ठाकरे यांनी फोन न उचलण्याचा “हा” अनुभव आधी देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत दादा पाटील यांनी घेतला होता. आता “हा” अनुभव संभाजीराजे यांना आला आहे.
महाराष्ट्रात 2019 च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस – राष्ट्रवादी आघाडीचा पराभव करून भाजप-शिवसेना महायुतीने बहुमत मिळवले होते. जनमताचा कौल भाजप-शिवसेना महायुतीला मिळाला होता. महायुतीचे नेते म्हणून देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रीपदी विराजमान होणार हे जाहीर झाले होते… पण तसे घडले नाही… याला कारण एकच… उद्धव ठाकरे यांनी परफेक्ट राजकीय टायमिंग साधून देवेंद्र फडणवीस यांच्यासकट कोणत्याही भाजप नेत्याचा फोन उचलला नाही… नंतर जे घडले तो नजीकचा इतिहास आहे. पण त्याची सुरुवात उद्धव ठाकरे यांच्या फोन न उचलण्यातून झाली होती!!
कोणाचा फोन केव्हा उचलायचा आणि केव्हा उचलायचा नाही हे महाराष्ट्रातल्या बाकीच्या राजकारण्यांपेक्षा उद्धव ठाकरे यांना सर्वात अधिक कळते हेच यातून स्पष्ट झाले!!
आताही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे संभाजीराजे छत्रपति यांच्याशी प्रत्यक्ष भेटीत बोलले. दोघांमध्ये काही राजकीय गोष्टी निश्चित झाल्या. दोन्ही नेत्यांना मान्य ठरेल असा विशिष्ट ड्राफ्ट तयार झाला… पण नंतर परस्पर असे काही घडले की शिवसेनेने संजय पवार या संभाजीराजे यांच्या लाडक्या कार्यकर्त्याला राज्यसभेची उमेदवारी जाहीर केली. तशा बातम्या प्रसारमाध्यमांमध्ये आल्या.
या संदर्भात विचारणा करण्यासाठी संभाजीराजे यांनी शिवसेनेच्या खासदारांना, मंत्र्यांना फोन लावले. त्यांनी फोन उचलले पण ते गप्प राहिले. ते काही बोलू शकले नाहीत म्हणून नंतर संभाजीराजे यांनी मुख्यमंत्र्यांना फोन लावला… पण मुख्यमंत्र्यांनी नेमका “त्याच वेळचा” संभाजीराजे यांचा फोन उचलला नाही… आणि मग आज घडत असलेला वर्तमानातला इतिहास घडला!! संभाजीराजे यांनी मुख्यमंत्र्यांवर शरसंधान साधत राज्यसभा निवडणुकीतून माघार घेतली. स्वराज्य संघटना बांधण्यासाठी ते बाकीच्या राजकीय पक्षांच्या बंधनातून मोकळे झाले!!
तसेही संभाजीराजे शिवबंधन बांधून घेणारच नव्हते. शिवसेना पुरस्कृत उमेदवार घेण्याची भही त्यांची तयारी नव्हती. शिवसेनेचा पाठिंबा त्यांना महाविकास आघाडीचा पुरस्कृत उमेदवार म्हणून अपेक्षित होता. शिवसेनेने तो दिला नाही… पण याची सुरुवात मुख्यमंत्र्यांनी संभाजीराजे यांचा फोन न उचलणे यातून झाली… हेच नेमके देवेंद्र फडणवीस आणि संभाजीराजे यांच्यातले साम्य आहे!!
महाराष्ट्रात गेल्या 40 वर्षापासून “खंजीर खुपसणे” हा राजकीय वाक्प्रचार जोरात चर्चेत आहे. इथून पुढे “खंजीर खुपसणे” या ऐवजी “फोन न उचलणे” हा वाक्प्रचार प्रचलित झाल्यास आश्चर्य वाटायला नको!!
Fadnavis – What happened to Sambhaji Raje ??; Uddhav Thackeray picks up the phone
महत्वाच्या बातम्या
- मुख्यमंत्र्यांवर थेट शरसंधान साधत संभाजीराजेंची राज्यसभा निवडणुकीतून माघार!!
- राज्यसभा निवडणूक : संभाजीराजांचे गणित जुळेना, माघारीची आक्रमक तयारी!!; पत्रकार परिषदेकडे महाराष्ट्राचे लक्ष
- 2024 : कलम 144 नव्हे, भाजपसाठी मिशन 144; काटेकोर नियोजनासह मोर्चेबांधणी!!
- Gandhi – Savarkar – Jinnah : गांधी – सावरकर – जीना एकत्रित बैठकीचा प्रस्ताव कोणी दिला होता??, पण ती कोणी टाळली…??