प्रतिनिधी
नागपूर : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज अत्यंत खालच्या पातळीवरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर नागपूरात टीका केली. शिवसैनिकांना संबोधताना उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस नागपूरला लागलेला कलंक आहेत, अशा शब्दांत शरसंधान साधले. उद्धव ठाकरेंच्या या टीकेवरून महाराष्ट्र भाजपमध्ये प्रचंड संताप उसळला असून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी जोरदार अत्यंत कठोर शब्दात उद्धव ठाकरेंची निंदा करून त्यांना प्रत्युत्तर दिले आहे. Fadnavis told Uddhav Thackeray
त्या पाठोपाठ स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी प्रदीर्घ ट्विट करून उद्धव ठाकरेंना नेमका कलंक म्हणजे काय हे परखड शब्दात सुनावले आहे.
देवेंद्र फडणवीस यांचे ट्वीट असे :
‘कलंकीचा काविळ’ !
1) ज्यांच्यावर शेण खाल्ल्याचा आरोप केला, त्यांच्याचसोबत पंक्तीला बसून खाणे याला म्हणतात कलंक!
2) आमच्या हृदयस्थानी असलेल्या हिंदूहृदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांना जनाब संबोधन सहन करणे, याला म्हणतात कलंक!
3) सकाळ, दुपार, संध्याकाळ वीर सावरकरांचा अपमान करणार्यांच्या मांडीला मांडी लावून बसणे याला म्हणतात कलंक!
4) सकाळी वीर सावरकरांचा अपमान करणार्यांच्या गळ्यात त्याचदिवशी रात्री गळे घालणे, याला म्हणतात कलंक!
5) ज्यांच्यावर राज्याच्या संरक्षणाची जबाबदारी, त्यांनीच पोलिसांना चक्क वसुलीला लावणे, याला म्हणतात कलंक!
6) पोलिस दलातील स्वपक्षीय कार्यकर्त्याकडून उद्योगपतींच्या घरासमोर स्फोटके ठेवल्यावर त्याची पाठराखण करणे, तो लादेन आहे का असे विचारणे, याला म्हणतात कलंक!
7) कोरोनाच्या काळात मुंबईत लोक मरत असताना मृतदेहांच्या बॅगांमध्ये सुद्धा घोटाळा करणे, याला म्हणतात कलंक!
8) लोकशाहीच्या सर्वोच्च मंदिरात न बसता लोकशाहीच्या पोकळ गप्पा मारणे, याला म्हणतात कलंक! असो, स्वत: कलंकित असले की इतरही कलंकित दिसायला लागतात. तुम्हाला ‘कलंकीचा काविळ’ झाला असेल तर एकदा उपचार करुन घ्या उद्धवजी!
देवेंद्र फडणवीस यांनी वर उल्लेख केलेले ट्विट करून उद्धव ठाकरेंचे अक्षरशः वाभाडे काढले.
Fadnavis told Uddhav Thackeray
महत्वाच्या बातम्या
- पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेचे अध्यक्ष डॉ. विवेक देबरॉय यांना “भांडारकर स्मृती” पुरस्कार जाहीर
- भारतीय नौदलाला मिळू शकतात २६ ‘Rafale-M’ लढाऊ विमाने; मोदींच्या फ्रान्स दौऱ्यात होऊ शकतो शिक्कामोर्तब!
- तीन राज्यांमधील राज्यसभेच्या १० जागांसाठी होणार निवडणूक, मात्र काँग्रेसच्या झोळी रिकामीच राहणार!
- पंतप्रधान मोदींना लोकमान्य टिळक पुरस्कार जाहीर; राष्ट्रवादीच्या फुटीनंतर मोदी – पवार प्रथमच एका व्यासपीठावर