• Download App
    Fadnavis Slams Thackeray Brothers at BJP Rally At a BJP rally in Mumbai, CM Devendra Fadnavis criticized Uddhav and Raj Thackeray, stating that merely bearing the 'Thackeray' name does not create a brand; the true brand was Balasaheb Thackeray himself. He vowed to win the upcoming Mumbai municipal elections.

    Devendra Fadnavis, : भाजप कार्यकर्त्यांच्या मेळाव्यामध्ये फडणवीसांचा ठाकरे बंधूंना टोला- केवळ नाव लावून ब्रँड तयार होत नाही

    Devendra Fadnavis,

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : Devendra Fadnavis शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हेच खरे ब्रँड होते. त्यामुळे तुम्ही उगाचच दावा करू नका. केवळ नाव लावून ब्रँड तयार होत नसतो, असा टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव व राज ठाकरेंना लगावला. आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी भाजपने कंबर कसली असून, मुंबईत आयोजित केलेल्या ‘विजय संकल्प मेळाव्या’तून भाजपने मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले आहे. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महायुतीचाच महापौर मुंबईत बसवणार असल्याचा ठाम निर्धार व्यक्त केला. दक्षिण मुंबईतील वरळी डोम येथे मंगळवारी भाजप कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह मंत्री आशिष शेलार, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, मुंबई अध्यक्ष अमित साटम आणि पक्षाचे जवळपास सर्व आमदार व प्रमुख नेते उपस्थित होते.Devendra Fadnavis,

    आपल्या भाषणात देवेंद्र फडणवीस यांनी २०१७ च्या निवडणुकीतील अनुभव सांगितला. त्यावेळी भाजप केवळ दोन मतांनी कमी पडला होता. परंतु, मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेच्या विनंतीवरून भाजपने ‘मन मोठे’ दाखवत महापौरपद त्यांना दिले. एवढेच नाही तर उपमहापौर आणि स्थायी समिती अध्यक्ष ही पदेही शिवसेनेला देण्यात आली. मात्र, २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेनेने साथ सोडल्याने, ‘अच्छा सिला दिया तूने मेरे प्यार का’ या गाण्याची आठवण झाल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. २०२२ मध्ये राज्यात सत्तांतर झाले आणि भाजपने एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेसोबत पुन्हा सरकार स्थापन केले. छत्रपती शिवाजी महाराजांकडून प्रेरणा घेऊन, गमावलेली सत्ता पुन्हा मिळवल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. त्यांनी मुंबई मनपा निवडणुकीकडे लक्ष केंद्रित केल्याचेही स्पष्ट दिसून आले.Devendra Fadnavis,



    मेळाव्यानिमित्त भाजप नेत्यांनी केले शक्तिप्रदर्शन

    या मेळाव्याच्या निमित्ताने भाजपच्या स्थानिक नेत्यांनी जोरदार शक्तिप्रदर्शन केले. प्रत्येकाने स्वत:चे समर्थक मोठ्या संख्येने आणले होते. त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. या मेळाव्यातून नवे प्रदेशाध्यक्ष चव्हाण, मुंबई शहराध्यक्ष साटम यांना बळ देण्याचा प्रयत्न मुख्यमंत्री फडणवीसांनी केला.Devendra Fadnavis,

    मोदींचे परराष्ट्र धोरण तारक नव्हे तर मारक- उद्धव ठाकरे

    दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे परराष्ट्र धोरण भारतासाठी तारक नव्हे तर मारक असल्याची टीका उद्धव ठाकरेंनी भारत-पाक क्रिकेट सामन्यावर केंद्र सरकारवर निशाणा साधताना केली. ते म्हणाले की, या सरकारने अमित शाहांचा मुलगा जय याच्या हट्टापायी पाकसोबत क्रिकेट खेळून देशाची प्रतिमा व देशभक्तीचा चुराडा केला. धाराशिव जिल्ह्यातील काही कार्यकर्त्यांचा ठाकरे गटात प्रवेश झाला. यावेळी उद्धव म्हणाले, कर्ज काढून ठेकेदारांच्या हितासाठी रस्त्यांचे, पुलांचे, धरणांची कामे करत असाल, तर मी त्याला विकास मानायला तयार नाही. शेतकऱ्यांना एक ठराविक रक्कम सरसकट देण्याची गरज आहे. तुम्ही देवाभाऊ नावाने तुम्ही करोडो रुपयांची जाहिरात करता. छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणांवर फुले वाहताना जाहिरात केली. त्यावर कोट्यवधी रुपयांचा चुराडा करण्यात आला. हे पैसे शेतकऱ्यांना द्यायला हवे होते.असेही ते म्हणाले.

    बेस्ट निवडणुकीत त्यांनी माझा सल्ला ऐकला नाही

    फडणवीस म्हणाले, “काही लोक उगाचच आपला ‘ब्रँड’ असल्याचा दावा करत होते. आम्ही त्यांना बेस्टच्या निवडणुकीत पक्षाच्या नावावर न लढण्याचा सल्ला दिला, पण त्यांनी तो ऐकला नाही. शेवटी शशांकराव, प्रवीण दरेकर आणि प्रसाद लाड यांनी त्या ‘ब्रँड’चा बँड वाजवला. खरेतर हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे हाच खरा ब्रँड होता, केवळ नाव लावल्याने कोणीही ब्रँड बनत नाही. भाजप कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. सामान्य कार्यकर्ता, जसा की अमित साटम, भाजपचा अध्यक्ष होऊ शकतो, हे पक्षाने सिद्ध केले आहे. भाजपचा सर्वात मोठा जागतिक ब्रँड नरेंद्र मोदी आहेत, असेही ते म्हणाले.

    Fadnavis Slams Thackeray Brothers at BJP Rally

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Gold Price : सोने तब्बल 1,029 रुपयांनी वाढून 1.11 लाखांच्या सर्वोच्च पातळीवर; चांदीचाही प्रति किलो ₹1.29 लाखांचा विक्रमी उच्चांक

    Pratap Sarnaik : शेतकऱ्यांच्या मुलांची पिळवणूक करणाऱ्या कला केंद्रांचे परवाने तात्काळ रद्द करा

    Beed railways : बीडकरांचे रेल्वेचे स्वप्न साकार; उद्या पहिली रेल्वे धावणार, मराठवाड्याच्या विकासाला चालना