प्रतिनिधी
मुंबई : कर्नाटकात बहुमतानिशी सत्तेवर आल्याबरोबर काँग्रेस सरकारने स्वातंत्र्यवीर सावरकर आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांच्यावरचे धडे शालेय अभ्यासक्रमातून काढून टाकले. मात्र, यावरून आता कर्नाटक आणि महाराष्ट्रातून भाजपच्या नेत्यांनी काँग्रेसवर जोरदार शरसंधान साधले. Fadnavis, Shelar’s Congress – sharsandhan on Thackeray
महाराष्ट्रातील नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुंबई भाजपचे अध्यक्ष आमदार आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरे यांच्यावरही निशाणा साधला. सावरकरांचा धडा सावरकर आणि डॉ. हेडगेवार यांच्यासारख्या महान स्वातंत्र्यसैनिकांचे धडे तुम्ही पुस्तकाच्या पानातून वगळलाल, पण जनतेच्या मनातून त्यांचे स्थान कसे वगळू शकाल??, असा बोचरा सवाल फडणवीस आणि शेलार या दोन्ही नेत्यांनी केला.
काँग्रेसचे नेते स्वातंत्र्यवीर सावरकरांचा वारंवार अपमान करतात. उद्धव ठाकरे नेहमी सावरकरांची बाजू घेऊन बोलतात. पण ते नुसतेच बोलघेवडे आहेत. आता कर्नाटक मधल्या काँग्रेस सरकारने सावरकरांचा धडा अभ्यासक्रमातून वगळल्यानंतर ते काय परखड भूमिका घेणार??, कारण त्यांनी सत्तेसाठी कायम काँग्रेसची तडजोड केली आहे आणि काँग्रेसच्या नेतृत्वाकडे कायम झुकले आहेत, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली, तर अशिष शेलार यांनी काँग्रेसवाल्यांना बेअक्कल या शब्दात ठोकून काढले. त्यांनी बेअक्कल काँग्रेसवाल्यांनो हे शब्द वापरूनच परखड ट्विट केले.
Fadnavis, Shelar’s Congress – sharsandhan on Thackeray
महत्वाच्या बातम्या
- पीएम मोदींसाठी डिनर होस्ट करणार बायडेन फॅमिली; पंतप्रधान 21 जून रोजी बायडेन-जिल यांचे पाहुणे असतील, दुसऱ्या दिवशी स्टेट डिनर
- अंतराळातून कसे दिसले बिपरजॉय चक्रीवादळ? सौदीच्या अंतराळवीराने टिपली भयंकर दृश्ये
- उत्तर प्रदेश : दारुल उलूम देवबंदने विद्यार्थ्यांना इंग्रजी शिकण्यावर घातली बंदी!
- अहमदाबादमध्ये लँडिंग दरम्यान इंडिगो फ्लाइटला ‘टेल स्ट्राइक’चा फटका