• Download App
    जरांगे पाटलांच्या उपोषण समाप्तीने फडणवीस समाधानी; मराठा आरक्षणासाठी पुन्हा निर्धार!! Fadnavis satisfied with the end of hunger strike of Jarange Patil

    जरांगे पाटलांच्या उपोषण समाप्तीने फडणवीस समाधानी; मराठा आरक्षणासाठी पुन्हा निर्धार!!

    प्रतिनिधी

    जयपूर : मराठा आरक्षणासाठी जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी मध्ये उपोषणाला बसलेले मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण मागे घेतले, याविषयी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समाधान व्यक्त केले आहे. त्याचबरोबर मराठा आरक्षण आणि मराठा समाजाच्या कल्याणकारी योजनांसाठी सरकार कटीबद्ध असल्याचा निर्धारित व्यक्त केला आहे. Fadnavis satisfied with the end of hunger strike of Jarange Patil

    जरांगे पाटलांनी उपोषण मागे घेतल्यानंतर फडणवीस यांनी आपल्या सोशल मीडिया अकाउंट वर भावना व्यक्त केल्या.

    त्या अशा :

    • मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी आपले उपोषण मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे तसेच मंत्रिमंडळातील अन्य सहकार्‍यांच्या उपस्थितीत आज मागे घेतले, ही समाधानाची बाब आहे.
    • मराठा आरक्षणाबाबतीत आम्ही प्रारंभीपासून सातत्याने प्रयत्नरत राहिलो. ते आम्ही दिले आणि हायकोर्टात टिकले सुद्धा. सुप्रीम कोर्टात ते का टिकले नाही?, यावर मत व्यक्त करण्याची आज वेळ नाही.
    • मात्र, सारथी, छत्रपती राजर्षि शाहू महाराज शैक्षणिक शुल्क प्रतिपूर्ती योजना, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून उद्योजकतेला प्रोत्साहन, अधिसंख्य पदांची भरती अशा अनेक उपाययोजना अंमलात आणण्यात आल्या. आजही या सर्व बाबतीत अतिशय गतीने काम सुरू आहे.
    • भविष्यात सुद्धा मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या नेतृत्त्वात मराठा आरक्षण तसेच मराठा समाजाच्या कल्याणकारी योजनांसाठी आमचे सरकार प्रयत्नांची शर्थ करेल.

    Fadnavis satisfied with the end of hunger strike of Jarange Patil

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले- ठाकरे सरकार नसते तर दीड वर्षे आधीच मेट्रो आली असती; मुंबई मेट्रो लाईन-2 सेवेचा शुभारंभ

    Dadar station : महाराष्ट्रात सतर्कता; दादर स्टेशनजवळ स्वामीनारायण मंदिरात पोलिसांकडून मॉक ड्रिल; मुख्यमंत्र्यांची बैठक

    Mumbai Metro ‘मुंबई मेट्रो मार्ग 3, टप्पा 2’ सेवेचा शुभारंभ ; फडणवीसांनी दाखवला हिरवा झेंडा